पुस्तक विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत

कोरोनामुळे यंदाही शाळा ऑनलाइन सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी अप्पा बळवंत चौकातील पुस्तकांच्या दुकानांत पालकांची वर्दळ वाढली आहे.
Book Stall
Book StallSakal

पुणे - कोरोनामुळे (Corona) यंदाही शाळा ऑनलाइन (School Online) सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक साहित्याच्या (Education Equipment) खरेदीसाठी (Purchasing) अप्पा बळवंत चौकातील पुस्तकांच्या दुकानांत (Book Shop) पालकांची (Parents) वर्दळ वाढली आहे. काही प्रमाणात व्यवसाय (Business) सुरू झाला असल्याचा आनंद शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांनी व्यक्त केला असला, तरी ते अद्याप ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. (Booksellers Waiting for Customers)

पुढील वर्गात जाताना नवीन वह्या, पुस्तकांसह शैक्षणिक साहित्य खरेदी व ती शाळेत घेऊन जाणे लहान विद्यार्थ्यांना आनंद देणाऱ्या बाबी आहेत. मात्र, गेल्या वर्षापासून ऑनलाइन शिक्षणामुळे त्याचा आनंद हिरावला गेला आहे. त्याचा परिणाम शैक्षणिक साहित्यावर अवलंबून असलेल्या अप्पा बळवंत चौकातील बाजारपेठांवर झाला. ऑनलाइन शिक्षणामुळे वह्या, पेन, पेन्सिल, पाटी, रंग आदी शैक्षणिक साहित्यांची मागणी कमी झाली आहे. मुलांच्या लेखनाच्या सवयीवर याचा परिणाम होत आहे. त्यांना घर बसल्या कलात्मक गोष्टी करता येण्यासाठी रंग, कागद अशा चित्रकलेच्या साहित्यांची खरेदी जास्त करत असल्याचे काही पालकांनी सांगितले.

Book Stall
पुणे-सोलापूर मार्गाने प्रवास करताय? वाचा महत्त्वाची बातमी

वह्या, पुस्तके व इतर साहित्यांच्या खरेदीतून होणारी उलाढाल निम्म्याहून कमी झाली आहे, असे विक्रेते सागर भोसले यांनी सांगितले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने यंदा मागविलेल्या साहित्यापैकी थोडाच माल विकला गेला असल्याचे

स्टेशनरी विक्रेते तन्मय मोरे यांनी सांगितले. शाळा ऑॅनलाइन असली, तर नोट्स पाठ्यक्रमासाठी वह्यांची गरज आहेच. परंतु, आता पूर्वी ज्या संख्येत वह्या घेत होतो तेवढ्या यंदा घेतल्या नाहीत, असे दीप्ती भांडारकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com