सांगवीत बूट चोरीचा गुन्हा दाखल

संदीप घिसे
मंगळवार, 1 मे 2018

विद्या समाधान कदम (वय ३२, रा. सह्याद्री निवास, पिंपळे गुरव) यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पिंपरी : घराबाहेरील कपाटामध्ये ठेवलेला बुट चोरून नेला. या प्रकरणी सोमवारी (ता.३०) सांगवी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

विद्या समाधान कदम (वय ३२, रा. सह्याद्री निवास, पिंपळे गुरव) यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम यांनी आपल्या घराबाहेरील कपाटामध्ये दोन हजार ८५० रुपयांचा बूट ठेवला होता. अज्ञात चोरट्याने तो चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: boot thief in sangvi

टॅग्स