बोरी-अकोले रस्त्याचे व पुलाचे काम निकृष्ठ

राजकुमार थोरात 
सोमवार, 2 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : बोरी (ता.इंदापूर) येथे पुलाचे व बोरी-अकोले व रस्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून काम चांगल्या दर्जाचे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन बोरी-अकोले रस्त्यासाठी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासुन रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र ठेकेदार रस्त्यासाठी निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापर असल्याने डांबरीकरण उखडू लागले आहे. तसेच बोरी गावाजवळील ओढ्यावरती पुल बांधण्याचे काम सुरु असून पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून मातीमिश्रित वाळू वापरली जात असून कमी सिमेंट वापरले जात आहे.

पुलाच्या बांधकामावर गेल्या तीन-चार दिवसांपासून पाणी न मारल्यामुळे बांधकाम ठिसूळ झाले आहे. ग्रामस्थांनी याबाबत संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली अाहेत. ग्रामस्थांनी पुलावरती जाऊन कामाची पाहणी केली. रस्त्याचे व पुलाचे काम चांगल्या दर्जाचे न केल्यास काम बंद  ठेवण्याचा इशारा बोरी ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागातदार संघाचे सदस्य भारत शिंदे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रामभाऊ जोरी, तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोक पाटील, आझाद मुलाणी, हरिदास देवडे, दयानंद चव्हाण, दत्तात्रय शिंदे, सचिव कुचेकर, बापु धायगुडे, राजू ठोंबरे उपस्थित होते.

Web Title: bori akole road work inferior quality