प्रवाशांना मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकासह दोघांना अटक 

Both of them were arrested along with the rickshaw driver
Both of them were arrested along with the rickshaw driver

पुणे : गावाकडे निघालेल्या पश्‍चिम बंगालमधील एका मजुरासह चौघांना रिक्षाचालकाने दोन साथीदारांच्या मदतीने मारहाण केली. स्वारगेट परिसरात रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेत साडेतीन हजारांची रोकड पळविणाऱ्या रिक्षाचालकासह दोघांना पोलिसांनी तत्काळ अटक केली. 

या प्रकरणी इमाम शिपाई (वय 39, रा. वदवली, ता. वाई, जि. सातारा) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रिक्षाचालक विजय हरिभाऊ कुंभार (वय 30, रा. शाहू वसाहत, पर्वती), बाळासाहेब ऊर्फ संदीप रामदास आरू (वय 48, रा. आंबेगाव पठार), राजेंद्र गणपत साळेकर (वय 42, रा. श्रीराम हाईट्‌स, धायरी फाटा) यांना अटक करण्यात आली आहे. 

बीएसएनएलचे मोबाईल टॉवर उभारण्याचे काम वाई परिसरात सुरू आहे. तेथे इमाम अन्य सहकाऱ्यांसह काम करतात. रविवारी पहाटे एसटीने स्वारगेटला पोचल्यानंतर तेथून पुणे रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी इमाम व त्यांचे चार सहकारी तेथील रिक्षात बसले. विजय कुंभार याने रिक्षा रेल्वे स्थानकाऐवजी डायस प्लॉट परिसरातील कालव्याजवळ नेली. तेथे त्याचे साथीदार साळेकर व आरू यांच्या मदतीने फिर्यादींना बेदम मारहाण केली. इमाम यांच्याकडील साडेतीन हजारांची रोकड हिसकावून त्यांनी तेथून पळ काढला. या प्रकाराची माहिती दिल्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक समाधान पाटील व सहकाऱ्यांनी क्रमांकावरून रिक्षाची माहिती काढली आणि कुंभार व साथीदारांना अटक केली. 

प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह 
स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथील बस, एसटी व रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी प्रवाशांच्या रिक्षाचालक व खासगी वाहतूकदारांकडून होणाऱ्या लुबाडणुकीच्या घटना घडतात. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com