पुणे - हडपसर येथे अपघातात तरूण मृत्युमुखी

संदिप जगदाळे
बुधवार, 28 मार्च 2018

हडपसर (पुणे) : ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरून तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर रस्त्यावर भोरी पडळ येथे घडली. 

हडपसर (पुणे) : ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरून तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर रस्त्यावर भोरी पडळ येथे घडली. 

प्रविण बाबरुवान अंबाड (वय 26 रा. सिद्धार्थनगर, साळुंखेविहार, कोंढवा) असे अपघात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी तौफिक हारून शेख (वय 33 रा. जळगाव) टॅंकर चालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण मगरपट्टा येथून कार्यालयीन काम संपवून घरी निघाला होता. तो भोरीपडळ येथे आले असता मगरपट्टा उड्डाण पुलावरून आलेल्या ट्रकची त्याच्या दुचाकीला धडक बसली. यावेळी तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

Web Title: boy died in an accident at Hadapsar pune