13 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

वारजे (पुणे) : महापालिकेच्या पथदिव्याच्या विजेच्या खांबाला धक्का लागून वारजे परिसरातील तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पृथ्वीराज विशाल चव्हाण (वय 13, रा. वारजे माळवाडी शनि मंदिराजवळ) याचा बळी गेला.

पृथ्वीराज हा सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान महामार्गाजवळील सेवा रस्त्यावर जॉगिंग करण्यासाठी गेला असता त्याने आपली सायकल महापालिकेच्या पथदिव्याच्या खांबाला लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळेस त्याला खांबातून शॉक लागून त्याच खांबाला तो चिकटून बसला. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पृथ्वीराजला काठीच्या साह्याने बाजूला करून जवळच असलेल्या माई मंगेशकर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपास वारजे पोलिस स्टेशनचे पुणे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर करत आहेत.

Web Title: a boy dies due to electric shock