नदीत स्टंटबाजी करायला गेला अन् प्रवाहात बुडाला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

निखिल थोरात हा दरवर्षी पावसाळ्यात नदीला पाणी सोडल्यानंतर शिवाजी पुलावरुन उडी मारण्याचा स्टंट करतो. यावर्षीही त्याने मित्रासमवेत नदीच्या पाण्यात पुलावरुन उडी मारण्याचा स्टंट केला. त्यावेळी तो पाण्यात वाहून गेला

पुणे : शिवाजी पुलावरुन नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी  गेलेल्यांपैकी 18 वर्षीय एक मुलगा पाण्यात वाहुन गेला आहे. निखिल थोरात (वय 19, रा. कामगार वसाहत, शिवाजीनगर) असे पाण्यात वाहुन गेलेल्या मुलाचे नाव आहे. प्रवाहाला वेग असल्यामुळे ड़ेंगळे पुलावर अग्निशामक दल व अन्य यंत्रणेस शोध घेणे अडचणीचे ठरत आहे.

निखिल थोरात हा दरवर्षी पावसाळ्यात नदीला पाणी सोडल्यानंतर शिवाजी पुलावरुन उडी मारण्याचा स्टंट करतो. यावर्षीही त्याने मित्रासमवेत नदीच्या पाण्यात पुलावरुन उडी मारण्याचा स्टंट केला. त्यावेळी तो पाण्यात वाहून गेला. जीवरक्षक, अग्निशामक दल व पोलिसांकडुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र अद्याप तो आढळला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Boy drown in the Mutha river at pune