लघुशंकेला गेला अन् नाल्यात बुडाला;अग्निशमन दलाकडून जीवदान

पांडुरंग सरोदे
रविवार, 4 ऑगस्ट 2019

लघुशंकेसाठी नाल्याच्याकडेला गेलेल्या युवकाचा पाय घसरुन तो नाल्यात पडला. त्यास पोहता येत असूनही पाण्याच्या प्रवाहाच्या प्रचंड वेगामुळे त्याला बाहेर पडता येईना, याबाबत अग्निशामक दलास माहिती मिळाल्यानंतर त्यांनी युवकाला पाण्यातून बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. ही घटना रविवारी पहाटे गणेश पेठेतील बुरडी पुलाजवळ घडली.

पुणे: लघुशंकेसाठी नाल्याच्याकडेला गेलेल्या युवकाचा पाय घसरुन तो नाल्यात पडला. त्यास पोहता येत असूनही पाण्याच्या प्रवाहाच्या प्रचंड वेगामुळे त्याला बाहेर पडता येईना, याबाबत अग्निशामक दलास माहिती मिळाल्यानंतर त्यांनी युवकाला पाण्यातून बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. ही घटना रविवारी पहाटे गणेश पेठेतील बुरडी पुलाजवळ घडली.

पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्याने तरुणास बाहेर पडता येइना. त्यामुळे तो नाल्यातील एका कप्प्याजवळ अडकला. यासंदर्भात अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. तरुणाला जिवंत बाहेर काढण्याठी जवानांनी प्रयत्न सुरु केले.

अधिकारी समीर शेख यांच्या आदेशानुसार जवान प्रकाश शेलार यांनी प्रवाहात उडी मारुन तरुणाचा शोध घेतला. पहिल्या फेरी त्यांना तरुण आढळला नाही. त्यामुळे शेलार बाहेर आले. त्यांनी जरा उसंत घेत परत डुबकी मारत शोध घेतला असता अडकलेला युवक शेलार यांना दिसला. क्षणाचा ही विलंब न करता युवकास रस्सी बांधून त्याला सुखरुप बाहेर आणले.

या कामगिरीत दलाचे अधिकारी सुनिल गिलबिले, समीर शेख, चालक राजु शेलार, नवनाथ मांढरे तसेच जवान राजाराम केदारी, प्रकाश शेलार, छगन मोरे, मंगेश मिळवणे, योगेश चोरघे, सुनिल टेंगळे, हेमंत सातभाई यांनी सहभाग घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Boy drowned in water saved by fire brigade