वाहतूक नियंत्रकामुळे मुलगा वडिलांच्या कुशीत

डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 3 जानेवारी 2019

मंचर - शाळेत जाण्यावरून घरचे रागावल्याने इयत्ता नववीतील १५ वर्षांचा मुलगा रागाने घराबाहेर पडला. तो शाळेत न जाता आलकुटीहून (ता. पारनेर) थेट सायकलवरून मंचरला आला. मंचर एसटी आगाराचे वाहतूक नियंत्रक महंमद सलीम सय्यद यांच्या जागरूकतेमुळे पोलिसांच्या मदतीने त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

मंचर (ता. आंबेगाव) येथील बस स्थानकात महेश नवनाथ घोलप हा विद्यार्थी चिंतेत बसला होता. थंडीचा कडाका होता. सय्यद यांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली. त्या वेळी समजले, की तो रागाने घरातून बाहेर पडला होता. शाळेत जातो, असे सांगून तो सायकलवरून आलकुटी, बेल्हे, राजुरी, आळेफाटा, नारायणगावमार्गे मंचरला ६० किलोमीटर अंतर पार करून आला होता. भुकेने तो व्याकूळ झाला होता, तसेच थंडीमुळे कुडकुडत होता. सुरवातीला महेश काहीच बोलत नव्हता. सय्यद यांनी विश्‍वासात घेऊन त्याला नाश्‍ता व चहा दिला. त्याच्याशी गप्पा मारल्या, त्यानंतर त्याने वडिलांचे नाव व मोबाईल क्रमांक दिला. सय्यद यांनी मंचर पोलिस ठाण्याचे फौजदार अर्जुन शिंदे, पोलिस नाईक राजेंद्र हिले व जनार्दन सापटे यांच्याशी चर्चा करून महेशला पोलिसांकडे सुपूर्त केले.      

दरम्यान, महेश उशिरापर्यंत शाळेतून घरी न आल्याने आलकुटी येथे कुटुंबीय व नातेवाईक त्याचा शोध घेत होते. महेशचा शोध लागत नसल्याने सर्व जण चिंतेत होते, तेवढ्यात मंचर पोलिसांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर महेशचे वडील नवनाथ घोलप काही ग्रामस्थांबरोबर मंचर पोलिस ठाण्यात आले. 

Web Title: boy handed over the parents to him due to traffic control