खाणीत पोहायला गेला अन् जीव गमावून बसला

chankan.jpg
chankan.jpg

पुणे : बारावीचे उन्हाळी वर्ग बुडवून पोहायला जाणं एका विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलंय. पुण्याच्या चाकणमध्ये ही घटना घडली. गौतम नितूर असं या विद्यार्थ्यांचं नाव होतं.

गौतम बारावी विज्ञान शाखेच्या उन्हाळी वर्गात शिक्षण घेत होता. शुक्रवारी हाच वर्ग तो आणि त्याच्या चार मित्रांनी बुडवला. तिथून ते चाकणच्या मोई येथील खाणीत पोहायला गेले. गौतम नुकतंच पोहायला शिकला होता. अशातच तो एकटा खाणीच्या मधोमध गेला पण तिथून परतत असताना त्याला दम लागला आणि तो बुडू लागला.

सोबत असणाऱ्या मित्रांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले, पण गौतम त्यांना मिठी मारू लागला. त्यामुळे मित्र ही घाबरले, त्यात एकाच्या छातीला नखं ही लागली. शेवटी मित्रांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. तो पाण्यात बुडाला. काल त्याचा शोध न लागल्याने आज एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं. त्यांना गौतमला शोधण्यात यश आलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com