पुण्यातील 'या' गावात घातलाय चीनी वस्तू खरेदीवर बहिष्कार!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

 सरपंच  नितीन धावडे व ग्रामविस्तार अधिकारी हरिभाऊ पवार यांनी माहिती दिली की,''जून महिन्याची मासिक सभा नुकतीच झाली. यामध्ये सदस्या स्नेहल धावडे यांनी चिनी वस्तू वापरायच्या नाहीत. त्या वस्तुंना बंदी करावी असा मुद्दा उपस्थित केला. त्याला सर्वांनी एकत्रित येऊन तो ठराव एकमताने मंजूर केला आहे. 

वारजे माळवाडी(पुणे): भारत चीन सीमेवर तणाव वाढत असल्याने भारतातील लष्करी जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कोंढवे-धावडे गावाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा ठराव मंजूर ग्रामपंचायतमध्ये केला आहे. 60 हजार लोकवस्तीच्या गावात चिनी वस्तूंच्या खरेदी विक्रीवर बंदी घातली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील दुकानदारांनाही त्यांनी चिनी वस्तू विक्रीसाठी आणू नका अशी विनंती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

याबाबत, सरपंच  नितीन धावडे व ग्रामविस्तार अधिकारी हरिभाऊ पवार यांनी माहिती दिली की,''जून महिन्याची मासिक सभा नुकतीच झाली. यामध्ये सदस्या स्नेहल धावडे यांनी चिनी वस्तू वापरायच्या नाहीत. त्या वस्तुंना बंदी करावी असा मुद्दा उपस्थित केला. त्याला सर्वांनी एकत्रित येऊन तो ठराव एकमताने मंजूर केला आहे. यावेळी झालेल्या चर्चेनुसार गुलवान खोऱ्यात चीनने भारताच्या नि:शस्त्र लष्कराच्या जवानांवर अचानक भ्याड हल्ला केला. त्यात आपले २० जवान शहीद झाले. त्याच हल्ल्यात हल्ल्यात भारतीय जवानांनी अंदाजे ४३ चीन लष्करी जवानाना कंठस्थान घातले आहे. भारतीय सेनाचा आम्हाला कायमाच सार्थ आभिमान आहे. तो कायम राहणार आहे. म्हणून चीनला कायमची अद्दल घडविण्याच्या दृष्टीने व आर्थिक नाडी तथा स्त्रोत आपले देशात प्रयत्न सुरू आहेत. त्यादुष्टीने कोंढवे धावडे ग्रामपंचायतीमार्फत खारीचा वाटा (प्रयत्न) चिनी वस्तू वापरु नये, नव्याने खरेदी करताना देखील गावातील दुकानात या वस्तू विक्री करण्यावर बंदी घातली आहे. ग्रामपंचायतीमध्ये वापरणेत येणारे संगणक, स्टेशनरी, कटलरी व इत्यादी साहित्य फक्त भारतीय बनावटीचे वापरावे. सर्व ग्रामस्थ, बंधु भगिनीना बॅनर तथा दवंडी देऊन चायनीज वस्तुवर बहिष्कार टाकावा. या वस्तू वापरू नये याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीमार्फत, शासन अनुदानातील मंजुर कामावर देखील चीन ने तयार केलेल्या वस्तुचा वापर करणेत येऊ नये. गावातील सर्व दुकानदार, व्यापारी वर्ग यांना ग्रामपंचायतीमार्फत लेखी पत्र देऊन मेड ईन चाईना वस्तुवर बहिष्कार टाकून त्या वस्तू  विकणेबाबत आवाहन केले जाणार आहे.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोंढवे धावडेची परंपरा 
गावाचा समावेश कर्यात मावळात असल्याने या गावातील अनाम मावळे हिंदवी स्वराज्याचा उभारणीत कामी आले आहेत. तसेच, गावातील दोन हजार 625 एकर पैकी दोन हजार 475 एकर क्षेत्र राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनसाठी 50 वर्षांपूर्वी दिले आहे. कारगिल युद्धाच्या काही महिने अगोदर गावातील महेश वांजळे हा जवान काश्मीरमध्ये शहीद झाला आहे. आता चिनी वस्तूवर बहिष्कार भारतीय २० जवान शहीद झाले आहे. त्यांचा स्मरणात ग्रामपंचायतमार्फत २० झाडे लावणेत येतील. असा हा ठराव केला आहे. अशी आहे गावाची परंपरा आहे. 
 

पुणेकरांनो, सिंहगड रस्ता, कसब्यात वाढले रुग्ण; वारजे सर्वांत कमी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boycott on purchase of Chinese goods in kondhawe Dhawade village in Pune!