ग्रामीण भागातील युवकही बनले पायलट

मिलिंद संगई
बुधवार, 28 मार्च 2018

बारामती : बारावीनंतर अल्पावधीतच नोकरीची संधी मिळून आकर्षक पगार मिळणारे पायलटचे करिअर आता ग्रामीण भागातील युवकांनाही खुणावू लागले आहे. गेल्या काही वर्षात तालुका पातळीवरील अनेक युवक पायलट बनून आकर्षक पगाराची पॅकेजेस मिळवू लागले आहेत. बारामतीतीलच निखिल जाधव यांना वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी तीस लाख रुपयांचे पगाराचे वार्षिक पॅकेज पायलट झाल्यावर प्राप्त झाले आहे. 

बारामती : बारावीनंतर अल्पावधीतच नोकरीची संधी मिळून आकर्षक पगार मिळणारे पायलटचे करिअर आता ग्रामीण भागातील युवकांनाही खुणावू लागले आहे. गेल्या काही वर्षात तालुका पातळीवरील अनेक युवक पायलट बनून आकर्षक पगाराची पॅकेजेस मिळवू लागले आहेत. बारामतीतीलच निखिल जाधव यांना वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी तीस लाख रुपयांचे पगाराचे वार्षिक पॅकेज पायलट झाल्यावर प्राप्त झाले आहे. 

इतर क्षेत्रात बारावीनंतर किमान चार ते पाच वर्ष शिक्षण प्राप्त झाल्यानंतरच नोकरीची संधी प्राप्त होते. मात्र विमान प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी हुशार असल्यास बारा ते अठरा महिन्यातच तो कमर्शियल पायलट लायसेन्स प्राप्त करुन पायलट बनू शकतो. दोन तीन वर्षांच्या अनुभवानंतर त्यांना आकर्षक पगाराचे पॅकेज उपलब्ध होत आहे. विमानाने प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढत असल्याने पायलटसना देखील मागणी वाढू लागली आहे. 

गेल्या काही वर्षात पायलट बनू पाहणा-यांमध्ये तालुका पातळीवरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. हे प्रमाण आता चाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचले असून पालकही या बाबत आता जागरुक झालेले दिसतात, असे अॅकडेमी ऑफ कार्व्हर एव्हीशनचे जनरल मॅनेजर प्रमेश पारिख यांनी सांगितले.

बारामतीच्या निखिल जाधव यांचा प्रवास -
1.    बारामतीतील टीसी महाविद्यालयातून 2007 मध्ये बारावी उत्तीर्ण
2.    2010 मध्ये कमर्शियल पायलट लायसेन्स मिळाले. 
3.    लगेचच नोकरीची संधी उपलब्ध झाली. सहा वर्षे विविध कंपन्यात नोकरी
4.    2016 मध्ये कार्व्हर एव्हिएशनमध्ये वार्षिक तीस लाखांच्या पगाराची नोकरी

Nikhil jadhav

बारामतीच्या मैत्रेय शहा याचा प्रवास -
1.    बारामतीच्या टीसी महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण
2.    2009 मध्ये कमर्शियल पायलट लायसेन्स प्राप्त. 
3.    पुणे विद्यापीठातून उच्चशिक्षण प्राप्त.
4.    2013 पासून पायलट म्हणून कार्यरत.
5.    गो एअरमध्ये वार्षिक 85 लाखांचे पॅकेज. 

maitreya shaha

करिअर का निवडावे -
1.    उडानसारख्या योजनांमुळे अच्छे दिन येणार
2.    दिवसेंदिवस विमानप्रवास करणाऱ्यांची संख्या वाढती
3.     कमी कालावधीत नोकरीची अधिक संधी
4.    आकर्षक पगाराची पॅकेजेस उपलब्ध
5.    परदेशातही नोकरीची संधी मिळते 

गेल्या काही वर्षात बारामतीतून पायलट झालेली संख्या- 500
कोण पायलट बनू शकते -
1.    बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण विद्यार्थी पायलट बनू शकतात. 
2.    फक्त विद्यार्थीच नाही तर डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजकांनाही संधी
3.    थिअरी व प्रॅक्टीकल दोन्ही माध्यमातून शिक्षण
4.    प्रत्यक्ष विमान उड्डाणांद्वारे प्रशिक्षण.
5.    स्वताः विमान चालविण्याची इच्छा बाळगणा-यांनाही संधी. 
6.    मुलांइतकीच मुलींनाही पायलट बनण्याची संधी. 

Web Title: boys from villages are also become a pilot