‘बीपीओ’मध्ये रोजगाराच्या संधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पिंपरी - आयटीमधील बीपीओ (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) क्षेत्राच्या विस्तारासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या इंडिया बीपीओ प्रमोशन स्कीमचा विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्कस ऑफ इंडियातर्फे गुरुवारी (ता. २९) यासंदर्भात हिंजवडीमध्ये कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये नव्या बीपीओ कंपन्या सुरू करणाऱ्यांनी भाग घेतला होता. 

केंद्र सरकारने नव्या बीपीओ कंपन्यांना विस्तार करणे सहजशक्‍य व्हावे, म्हणून इंडिया बीपीओ प्रमोशन स्कीम सुरू केली आहे. आयटी कंपन्यांचा विस्तार झाला आहे. पुणे-मुंबई शहरे वगळता राज्यातील सांगली, वर्धा, नागपूर, औरंगाबाद, लातूर, भिवंडी, धुळे, नाशिक या शहरांसाठी ही योजना लागू केली आहे. 

आतापर्यंत यापैकी काही शहरांमध्ये १८ बीपीओ कंपन्या सुरू झाल्या असून, त्या ठिकाणी दोन ते अडीच हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये उर्वरित भागातील कंपन्या सुरू होणार आहेत, त्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. हा आकडा दहा हजारापर्यंत जाऊ शकेल, असे सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्कस ऑफ इंडियाचे संचालक संजयकुमार गुप्ता यांनी सांगितले. 

इंडिया बीपीओ प्रमोशन स्कीमला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात तरुणवर्गाला त्याचा चांगला फायदा होताना दिसेल. आयटीचा मोठ्या प्रमाणात विस्तार न झालेल्या शहरांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. राज्याच्या अन्य भागात राहणारी मंडळी बीपीओ किंवा आयटी कंपनीत काम करण्यासाठी शहराची वाट धरतात. मात्र, या योजनेमुळे त्यांना आपल्या गावामध्येच रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे गुप्ता यांनी नमूद केले.

Web Title: BPO Employment