...असा शोधला ब्रेसलेटवाला विद्यार्थी

रहाटणी - मुलाकडून हरवलेले ब्रेसलेट परत मिळाल्यानंतर शिक्षिकांचे कौतुक करताना पालक विद्या माने (डावीकडील प्रथम). त्यांच्याशेजारी शिक्षिका शालू आनंद व प्राचार्य प्रियांका अग्रहारी (उजवीकडील) यांच्या समवेत एसएनबीपी स्कूलच्या सहशिक्षिका.
रहाटणी - मुलाकडून हरवलेले ब्रेसलेट परत मिळाल्यानंतर शिक्षिकांचे कौतुक करताना पालक विद्या माने (डावीकडील प्रथम). त्यांच्याशेजारी शिक्षिका शालू आनंद व प्राचार्य प्रियांका अग्रहारी (उजवीकडील) यांच्या समवेत एसएनबीपी स्कूलच्या सहशिक्षिका.

पिंपरी - तो बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी, शाळेत निरोप समारंभ, वडिलांचे दोन तोळ्यांचे ब्रेसलेट घालून गेला, सायंकाळी ते हरवल्याचे लक्षात आले, वडील बोलतील किंवा मारतील अशी मानसिकता. परंतु त्यांनी त्याला आइस्क्रीम खाऊ घातले, पंधरा दिवस उलटले, एके दिवशी प्राचार्यांनी केबिनमध्ये बोलावले व काही हरवले आहे का? विचारले, त्यांनी त्याला ब्रेसलेट दाखवले, अन्‌ तो आश्‍चर्यचकित झाला.

भोसरी एमआयडीसीतील सेंच्युरी एन्का कंपनीतील कामगार व अभिनेते संतोष माने आणि योग शिक्षिका विद्या माने यांचा मुलगा शुभमची ही कहाणी. रहाटणीतील एसएनबीपी स्कूल व ज्युनियर कॉलेजचा तो विद्यार्थी. ३१ जानेवारीला निरोप समारंभ असल्याने वडिलांकडे त्याने ब्रेसलेट मागितले.

त्यांनीही शुभमला हो-नाही करत ब्रेसलेट दिले. मात्र, ते त्याच्या हातातून गहाळ झाले. शुभमसह त्याचे मित्र-मैत्रिणीही घाबरले. परंतु, माने दांपत्याने सर्व घटना जणू काही घडलेच नाही अशा पद्धतीने संयमाने हाताळली. १५ दिवसांनी प्राचार्या प्रियांका अग्रहारी यांनी शुभमला केबिनमध्ये बोलावून विचारपूस केली व कपाटातील ब्रेसलेट दाखवले. विजय नवले या शिक्षकांनी माने यांच्याशी संपर्क साधून शाळेत बोलावून घेतले व ब्रेसलेट त्यांच्या ताब्यात दिले. संगणक शिक्षिका शालू आनंद यांना ब्रेसलेट सापडले होते. त्यांनी ते प्राचार्यांकडे दिले होते.

आम्ही मुलाला ब्रेसलेट दिले, ही आमची चूक होती आणि रागावल्यानंतर मुलाने काही बरे-वाईट करू नये, याची भीती होती. त्यामुळे आम्ही गप्प बसलो. कुठेही तक्रार दिली नाही. मात्र, शिक्षकांनीही खबरदारी घेऊन एका फोटोवरून ब्रेसलेटवाला शोधून काढला. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यापुढे मुलांना किमती वस्तू देणार नाही. 
- संतोष माने, जुनी सांगवी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com