ब्राह्मण महासंघाचा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना विरोध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

 साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला ब्राह्मण महासंघाचे अनिल दवे यांनी विरोध केला आहे.''मराठी वैचारिक विश्वातला हा काळा दिवस आहे. फादर यांचे गॉडफादर कोण आहेत? असा सवाल दवे यांनी यावेळी उपस्थित केला.

पुणे : साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला ब्राह्मण महासंघाचे अनिल दवे यांनी विरोध केला आहे.''मराठी वैचारिक विश्वातला हा काळा दिवस आहे. त्यांचे गॉडफादर कोण आहेत? असा सवाल दवे यांनी यावेळी उपस्थित केला.

ते म्हणाले, ''फादर दिब्रेटो ख्रिस्ती धर्मप्रचार करत आहे, हिंदुत्वाला शिव्या देण्यात फादर दिब्रेटो हे कायम अग्रस्थानी आहे. पण फादर यांनी कधी ख्रिस्ती धर्मछळ, अंधश्रद्धा यावर टीका केली आहे काय?  मनुवाद गोडसेवाद, फेसिझम म्हणत ख्रिस्ती धर्म आणि ख्रिश्चन अंधश्रद्धेचा प्रसार करत आहे.

ख्रिस्ती धर्मांतर करणे हेच फादर दिब्रेटो यांचे जीवन ध्येय असल्याचा आरोप दवे यांनी यावेळी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brahmin Federation Opposition to President of Sahitya Parishad Father Francis Dibrito