सक्षमतेसह संस्कारवृद्धी आवश्‍यक - गोविंद कुलकर्णी

सिंचननगर - ‘ब्राह्मोद्योग २०१८’चे दीपप्रज्वलन करून उद्‌घाटन करताना महापौर मुक्ता टिळक.याप्रसंगी आनंद दवे,वसंत गाडगीळ, शेखर चरेगांवकर, शोभा फडणवीस, गोविंद कुलकर्णी, उदय महा, डॉ.जितेंद्र जोशी उपस्थित होते.
सिंचननगर - ‘ब्राह्मोद्योग २०१८’चे दीपप्रज्वलन करून उद्‌घाटन करताना महापौर मुक्ता टिळक.याप्रसंगी आनंद दवे,वसंत गाडगीळ, शेखर चरेगांवकर, शोभा फडणवीस, गोविंद कुलकर्णी, उदय महा, डॉ.जितेंद्र जोशी उपस्थित होते.

पुणे - ‘‘बुद्धिवादी ब्राह्मण समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी व्यवसायात उतरून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले पाहिजे. आर्थिक सक्षमतेसह संस्कारवृद्धीवर देखील ब्राह्मण समाजाने भर द्यावा,’’ असे मत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित ‘ब्रह्मोद्योग’ या पाचदिवसीय राष्ट्रीय महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, पं. वसंत गाडगीळ, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, नानासाहेब चितळे, भाजप नेत्या शोभा उपाध्याय, उद्योग आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र जोशी, प्रदेशाध्यक्ष उदय महा, प्रवक्ता संदीप खर्डेकर व जिल्हाध्यक्ष आनंद दवे उपस्थित होते. महोत्सवात भरविलेल्या ब्राह्मण उद्योजकांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन टिळक यांच्या हस्ते झाले.

कुलकर्णी म्हणाले, ‘‘समाजाच्या उत्कर्षासाठी केवळ सरकारवर विसंबून राहून चालणार नाही. आपण प्रत्येकाने आपल्या परीने समाजाच्या हितासाठी योगदान दिले पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून उद्योग, महिला, वकील आणि अशा एकूण ३२ आघाड्या समाजासाठी कार्य करीत आहेत. तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे व समाजातील इतरांना बरोबर घेऊन समाज सदृढ होण्यासाठी योगदान द्यावे. मात्र, आपल्या मूल्यांचा व संस्कारांचा विसर पडू देऊ नये.’’ सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.

तपश्‍चर्या, त्याग, समर्पण या जोरावर ब्राह्मण समाजाने आजवर आपली प्रगती केली आहे. अधिकाधिक ज्ञान आत्मसात करून समाजबांधवांचा उत्कर्ष होईल, या दृष्टीने आपले कार्य असावे.
- पं. वसंत गाडगीळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com