ॲपेक्‍स करिअर्स : एन. डी. ए. परीक्षा - अकरावीपासून तयारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

एन.डी.ए. मध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर तरुणांनी दहावी / अकरावीपासून तयारीला लागणे जरुरी आहे. यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे सेवापूर्व शिक्षण संस्था (एसपीआय) औरंगाबाद; परंतु संपुर्ण महाराष्ट्रातून फक्‍त ६० विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश मिळू शकतो. एसपीआयला प्रवेश न मिळाल्यास निराश होण्याचे कारण नाही. मुले स्वतः अकरावी- बारावीच्या तयारीसोबत एनडीए परीक्षेची तयारी करू शकतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावर्षी दहावीची परीक्षा देणारी मुले पुढील वर्षी सप्टेंबर २०२१ मध्ये होणारी एनडीए (२) ही परीक्षा देऊ शकतात. मुली मात्र अर्ज करण्यास पात्र नाहीत. स्वतः तयारी करण्यासाठी अकरावी- बारावीच्या नियमित अभ्यासाबरोबर एनडीए लेखी परीक्षेची तयारी, इंग्रजी संभाषण कौशल्य सुधारणा, दररोज नियमित व्यायाम/ खेळ आणि समतोल आहार घेतल्यास जुलै २०२० मध्ये ही तरुण मुले एनडीएमध्ये प्रवेश करू शकतात.

पुण्यात शिकणाऱ्या अकरावी- बारावी मुलांसाठी एक उत्तम पर्याय आहे की, ॲपेक्‍स करियर्सच्या ११ वी+ १२ वी+ एनडीएच्या दोन वर्षांच्या कोर्समध्ये प्रवेश घेणे. कारण आजतागायत १५० हून अधिक तरुणांनी ॲपेक्‍स करियर्सच्या प्रशिक्षणाद्वारे एनडीएमध्ये पदार्पण केले आहे. या कोर्सच्या व्यतिरिक्‍त एनडीए लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ४ महिने/ अडीच महिने/१ महिना अशा कालावधीचे क्रॅश कोर्सदेखील उपलब्ध केले आहेत. त्याचा लाभ घेऊनही अनेक तरुणांनी एनडीएमध्ये प्रवेश मिळविलेला आहे. याशिवाय एसएसबी मुलाखतीची तयारीदेखील करवून घेण्याची सोय या संस्थेत आहे. अधिक माहितीसाठी घोले रोड येथील महात्मा फुले वस्तू संग्रहालय आवारात असलेल्या ॲपेक्‍स करियर्सच्या कार्यालयात चौकशी करावी किंवा ९०२८२२१४५८/९८५०८८००५८  या मोबाईलवर संपर्क साधावा. 

संकेतस्थळ - www.apexcareers.org वर संपूर्ण माहिती मिळू शकेल.

प्रदीप ब्राह्मणकर, लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) (संस्थापक-ॲपेक्‍स करिअर्स, पुणे)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of Pune APEX CAREERS