एशियन नमकिन : उपवासाच्या पदार्थांसाठी विश्‍वासार्ह ओळख

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

आषाढ मासापासून सुरु होणाऱ्या उपवासाच्या निमित्ताने आपण अनेक पदार्थ घरच्या घरी बनवत असतो, पण काही असे नमकिन पदार्थ जसे की साबुदाणा चिवडा, बटाटा वेफर्स हे पदार्थ बहुदा बाहेरुन आणणे पसंत करतो, पण सध्याच्या ‘कोविड १९’च्या वातावरणात आपण सर्वच जण ‘हायजीन’कडे अधिक लक्ष देतो. नेमकी हीच बाब कात्रज येथील सुखसागर नगर येथील ‘एशियन नमकिन’ने हेरली आहे. त्यांनी ग्राहकांसाठी उत्कृष्ट चवीसोबत स्वच्छतेचे निकष पाळत उपवासाच्या काळात रसना तृप्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एशियन नमकिनचा १९६०साली श्री. बाबूभाई पटेल मूळचे गुजरातमधून नोकरीसाठी पुण्यात आले. त्यांना उमेदीच्या काळात अनेक संकटांचा व चढ-उतारांचा  सामना करावा लागला. पण या सर्व परिस्थितीवर मात करुन ते ठामपणे उभे राहिले. त्यानंतर सर्वसाधारणपणे २००० साली बाबूभाई पटेल, त्यांचा मुलगा नितीन पटेल आणि सून अलका या तिघांनीही विशेषकरुन उपवासाचे पदार्थ बनवून त्याचे वितरण करावे अशी प्राथमिक संकल्पना मांडली. ते पदार्थ नव्याने शिकण्यापासून त्याचे संपूर्ण संशोधन आणि विकासाची जबाबदारी अलका पटेल यांनी घेतली. या संपूर्ण प्रवासात त्यांची मेहनत ही अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांचे बटाटा शेव, उपवास फरसाण, केळ्यांची शेव, उपवास मोती साबुदाणा चिवडा, पोटॅटो चिप्सी- चाँप्सी यांसारखे पदार्थ ग्राहकांच्या खऱ्या पसंतीस उतरले. हळूहळू व्यवसायाचा विस्तार होऊ लागला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एशियन नमकिनची सर्व उत्पादने २००३पासून पुण्याबाहेर जाऊ लागली. सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, अहमदनगर, सोलापूरसह संपूर्ण राज्यभरात लोकप्रिय होऊ लागली. उत्कृष्ट चवीसोबत, वाजवी किंमत, उत्कृष्ट ब्रँडिंग, उत्कृष्ट गुणवत्ता निकषांच्या आधारावर अवघ्या काही कालावधीतच मागणी वाढली. त्यामुळे आता उपवासाचे पदार्थ म्हटले की, ‘एशियन नमकिन’ हेच नाव पुणेकरांच्या पसंतीस उतरले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये!

पत्ता - सुखसागर-नगर, कात्रज पुणे-४६
अधिक माहितीसाठी संपर्क - 
०२०-२६९६०४९५, ९४०४०६९८१९ 

Sakal Reader connect initiative 

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of Pune Asian Good Health