जॉइंट क्लिनिक : अस्थिरोग तज्ज्ञ व कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ

joints.jpg
joints.jpg

डॉ. हृषिकेश सराफ, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून पुण्यात कार्यरत आहेत. गुडघ्याची व खुब्याची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया, गुडघ्याची व खांद्याची दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, लिगामेंट रिकन्स्ट्रक्‍शनसारख्या अनेक सर्जरींमध्ये त्यांचा हातखंडा आहे. रोबोटिकनी रिप्लेसमेंट सर्जरी व ‘रोबोटिक युनी कॉन्डायलर नी रिप्लेसमेंट सर्जरी’ सर्वप्रथम पुण्यात सुरू करणारे व त्यात विशेष प्रावीण्य असलेले असे सर्जन म्हणजे डॉ. सराफ. नॅशनल व इंटरनॅशनल जर्नलमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. डॉ. हृषिकेश सराफ, शाश्वत हॉस्पिटल कोथरूड येथे कार्यरत असून, त्या हॉस्पिटलचे ते डायरेक्‍टरदेखील आहेत. शाश्वत हॉस्पिटल रोबोटिक सर्जरीचे केंद्र असून डॉ. सराफांकडे देशभरातून सर्जन रोबोटिक सर्जरी शिकण्यासाठी येतात. कर्वे रोडवर ‘जॉइंटस क्‍लिनिक’ नावाने डॉक्‍टरांचे क्‍लिनिक असून तेथे ते रोज संध्याकाळी असतात.

वैशिष्ट्ये : कोपराच्या हाडावर वरून छेद न घेता करता येणाऱ्या त्यांनी विकसित केलेल्या सर्जरीला जगन्मान्यता मिळाली आहे. अवघड अशा गुडघ्याच्या शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानाने कशा सोप्या होतात यावरील त्यांचा केस रिपोर्ट जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

उल्लेखनीय : वैयक्तिक प्रॅक्‍टिस करतानाच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून वसंतकाका सराफ चॅरिटेबल ट्रस्ट व शाश्वत हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी ५०० हून अधिक रुग्णांवर अत्यल्प दरात जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी करून दिल्या आहेत. 

  •  २१ मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च या ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो. 
  •  काश्‍मीरला आलेला पूर असो किंवा करोनाग्रस्त लोकांना मदत असो,  ट्रस्टच्या माध्यमातून ती करण्याचा डॉक्‍टरांचा सतत प्रयत्न असतो. वैद्यकीय ज्ञान लोकांपर्यंत पोचावे, पेशंट्‌सना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे मन निःशंक व्हावे म्हणून सोसायट्यांमध्ये जाऊन, गावोगावी शिबिर घेऊन गेली अनेक वर्षे ते व्याख्यानही देतात. 
  •  रेडिओच्या माध्यमातून अस्थिरोग व निदान, रोबोटिक सर्जरी एक वरदान, आता मला पुन्हा चालायचं अशा विविध कार्यक्रमांतून वैद्यकीय माहिती सोप्या शब्दात रुग्णांपर्यंत पोचवतात. 
  •  हसत खेळत जगू या हा त्यांचा रेडिओ प्रोग्रॅम विशेष लोकप्रिय होता. हे सर्व भाग यू-ट्यूबवर आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

     सर्व्हिसेस

  •  रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी
  •  हिप रिप्लेसमेम्ट सर्जरी
  •  खांद्याची आणि गुडघ्याची ऑर्थोस्कोपिक सर्जरी

     सुविधा 

  1.  एक्‍सरे विभाग
  2.  सुसज्ज फिजिओथेरपी विभाग
  3.  घरी फिजोथेरपी देण्याची सोय
  4.  २४ तास ऑन कॉल उपलब्ध 

डॉ. हृषिकेश सराफ
एम. एस., डी. एन. बी., (ऑर्थोपेडिक)
फोन नं. ९८२३३९८०३३, ७६२०४२७५२०

अधिक माहितीसाठी : www.drsarafjointsclinic.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com