उमेद केअर सेंटर : उमेदीची वर्ष हरपल्यानंतर उमेद निर्माण करणारी माणसे..!

umed.jpg
umed.jpg

आजकालच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सततच्या धडपडीत असताना आपल्या कुटुंबातील वयोवृद्ध, आजारी किंवा अंथरुणाला खिळलेल्या कुटुंबीयांची काळजी घेणे फारच जिकिरीचे असते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती अंथरुणाला खिळली तरी त्या व्यक्तीची नर्सिंग केअर घेणे व तिची देखभाल करणे फारच कठीण होऊन जाते. अशावेळी या आजारी प्रियजनांची घरच्याप्रमाणे काळजी व नर्सिंग केअर घेणाऱ्या माणसांची फारच गरज वाटू लागते.

नेमकी हीच गरज ओळखून समाजाचे ऋण फेडण्याच्या विचारापोटी उमेद केअर सेंटर या अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी काळजीवाहू सेंटरची स्थापना ७ सप्टेंबर २००० साली या संस्थेच्या संस्थापिका डॉ. रंजना कदम (पोवार) यांनी केली. त्यांच्या सोबत त्यांचे पती डॉ. राजाराम पोवारही त्यांच्या या कामात त्यांना मदत करतात. तेव्हापासून गेली २० वर्षे अहोरात्र हजारो वयोवृद्ध, आजारी, अंथरुणाला खिळलेल्या आजी-आजोबांची प्रेमाने देखभाल करून अनेक कुटुंबीयांना जगण्याची ‘उमेद’ उमेद केअर सेंटरने दिली.

उमेद केअर सेंटरमध्ये कोणाला अॅडमिट करता येते?
१. अंथरुणाला खिळलेले (बेडरीडन), २. पॅरलिसीस, ३. फ्रॅक्‍चर, ४. कोमा, ५. अल्झायमर (स्मृतिभ्रंश), ६. डिमेंशिया, ७. कॅन्सर, ८. बेडसोअर

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उमेद केअरची वैशिष्ट्ये : 

१. प्रशिक्षित व प्रेमळ
नर्सेसद्वारे देखभाल. 
२. रोज डॉक्‍टरांकडून तपासणी.  
३. प्रत्येकाच्या 
आजारांप्रमाणे आहार.
४. इमर्जन्सीमध्ये लागणाऱ्या 
उपकरणांची सोय. 
५. सर्वच सण-वार, आजी-आजोबांचे 
वाढदिवस उत्साहात साजरे केले जातात. 
६. अनाथ आजी-आजोबांचा मोफत सांभाळ केला जातो. 
उमेदच्या या आगळ्या वेगळ्या कार्याची दखल घेऊन समाजाने 
उमेदला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

अधिक माहितीसाठी एकदा अवश्‍य भेट द्या :
संस्थापिका डॉ. रंजना कदम (पोवार) ८०८००५३३११ /
७७७७००६६८२ 
डायरेक्‍टर डॉ. राजाराम पोवार ७६६६६१७७७१
स.नं. ३६/३, स्वामी समर्थनगर, गोकुळनगर चौक,
कात्रज-कोंढवा रोड, पुणे ४११०४६.
Website : www.umedcarecenter.in
Email : drpowar@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com