कवी ग्रुप : कवी ग्रुप ऑफ कंपनीजचा लक्षवेधी ब्रॅण्ड जिविका वॉटर प्युरिफायर

Jeevika
Jeevika

जिविका वॉटर प्युरिफायरचे उत्पादन करणाऱ्या उद्योग समूहाच्या पूर्वसुरींना मात्र धंद्यासाठी आवश्‍यक असणारी कोणतीच पार्श्‍वभूमी नव्हती. परंतु इच्छा असली की प्रगतीच्या नवनवीन वाटा सापडतात. काहीतरी नवीन, नावीन्यपूर्ण करण्याच्या उद्देशाने त्यांनी अत्यंत कमी भाग भांडवलातून या व्यवसायाची सुरुवात केली. आज त्याचा बहरलेला वटवृक्ष झाला आहे. मनुष्याला साधारणतः सर्वांत जास्त ८०% आजार हे दूषित पाणी पिण्यामुळे होतात ही गोष्ट लक्षात घेऊन, त्याच्यावर उपाय काय? यावर विचारमंथन सुरू झाले. गरज ही शोधाची जननी आहे. यावर विचार करताना शुद्ध पाणी हाच त्यावरील सर्वोत्तम उपाय आहे याबाबत पक्की खात्री पटली. त्यातून जिविका वॉटर प्युरीफायरची संकल्पना उदयाला आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वप्रथम या उद्योगाची सुरुवात करताना आपण एका संस्कारशील आई, व स्वातंत्र्य सैनिकांचे पोटी जन्माला आलोय यांची जाणीव ठेवून धैर्य, निष्ठा, स्वयंशिस्त, नियोजन, कर्तव्याप्रती तत्परता बाळगून तसेच गुणवत्ता व विश्वासार्हता यांची अजिबात प्रतारणा करायचे नाही. देश बांधवांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यायची हे ठरविले.

बाजारातील मोठे स्पर्धक, जे मोठ्या जाहिराती आणि मोठे कलाकार ब्रॅंड ॲम्बेसिडर म्हणून वापरतात. यामुळे वॉटर प्युरिफायरच्या किंमती वाढतात त्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जातात. याबरोबर  पुढील प्रश्‍न होतेच. बाजारात कसे उतरावे आणि कसे स्पर्धेला तोंड द्यावे? प्रथम त्यांनी प्रॉडक्‍टचा विचार केला त्यासाठी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता ‘जिविका’ प्रॉडक्‍ट तयार करून स्वतःचा डायकास्ट बनवला. जिविका वॉटर प्युरीफायरची प्रमुख वैशिष्ठे सांगताना शिवाजी म्हणाले की, ‘यामध्ये प्री - फिल्टर, सेडीमेंट फिल्टर, सिल्व्हराईज्ड प्री कार्बन फिल्टर, पोस्ट कार्बन कार्टराइज फिल्टर आणि आर.ओ., मेम्ब्रेन, अल्कलाईन टेक्‍नॉलॉजी असे फिल्टर आहेत. ज्यामुळे शुद्ध पाणी निरंतर मिळते. यांच्या किंमतीही खूपच माफक असून अंत्यत आकर्षक, चांगल्या प्रतीचे साहित्य ज्यामुळे ग्राहकांची विश्वासार्हता मिळाली. ह्या मॉडेलची किंमत रुपये १०,०००+ आहे ज्यासाठी बाजारपेठेतील विविध कंपन्या रुपये २५,०००+ किंमत आकारतात. याबरोबरच सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विक्रीपश्‍चात सेवा ही बाब खूप महत्त्वाची आहे. 

प्रगतीसाठी उद्योगाचे स्वरूप महत्त्वाचे नसते तर उद्योग लहान असला तरी त्यातून स्वप्रयत्नाने, कल्पकतेने मोठी झेप घेता येते. ग्राहकाची विश्वासाहर्ता संपादन करता येते. आज फक्त स्वतःच्याच नव्हे तर इतर ब्रॅण्ड्‌चेसुद्धा वार्षिक देखभाल व दुरुस्तीसेवा पुरवतात. ह्या प्रामाणिक व तत्पर सेवेतून  ग्राहकांशी कौटुंबिक नाळ जोडली गेली आहे.

याबरोबर कवी ग्रुपने ‘सॅमसंग’ ब्रॅण्डचे डेमो सेंटर (प्रॉडक्‍ट ऑर्डर केल्यावर २४ तासात त्याचे इंस्टॉलेशन करणे तेसुद्धा ग्राहकांच्या सोयीनुसार) सुरू केले आणि अल्पावधीतच या ग्राहकसेवेत उच्चांक गाठला.  दि. ०८/०३/२० रोजी ‘जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कवी ग्रुप ऑफ कंपनीजने ‘जिविका’ ‘शुद्ध व सीलबंद पाणी बॉटल २०० ml पासून २० लिटरचे जार वितरण करण्यास सुरुवात केली. हे सर्व करताना त्यांच्या मातोश्री कमलाबाई यांचे मार्गदर्शन, सुविद्य धर्मपत्नी सौ. स्वप्ना वाकळे आणि मुलगा विवेक यांचे पाठबळ, त्याबरोबरच १००+ सहकारी व सेवकवृंद यांचे बहुमोल सहकार्य लाभले हे आवर्जून नमूद करतात. आज जिविका ब्रॅंड २५०+ डिलरशिपमधून पुण्यातून ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. याबद्दल आपण केलेले कष्ट, उत्तम दर्जाचे प्रॉडक्‍ट, नवनवीन संकल्पना आणि उत्तम ग्राहक सेवा ह्या गोष्टी आहेत. याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. माणसांशी जिव्हाळ्याचं नातं, विश्वास, चिकाटी, प्रचंड कष्ट, नावीन्याचा शोध आणि आधुनिकतेची कास या गुणांवर हा उद्योगसमूह उभा राहिला आहे.

अधिक माहितीसाठी - www.jeevikapurifier.com,
Email : wakaleshivaji@yahoo.co.in 
संपर्क : ९०२८८ ८८९०२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com