ग्राहकांशी एकरूप झालेली विश्वसनीय गृहनिर्माण कंपनी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 August 2020

कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (केपीडीएल) ही बांधकाम क्षेत्रातील पूर्णतः आत्मनिर्भर व सातत्याने प्रगती साधत असलेली कंपनी आहे. त्या ठिकाणी ग्राहक केंद्रित आणि जमाखर्चाच्या ताळेबंदाचा समन्वय साधत कॅश फ्लोची अखंडता साधली जाते.

कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (केपीडीएल) ही बांधकाम क्षेत्रातील पूर्णतः आत्मनिर्भर व सातत्याने प्रगती साधत असलेली कंपनी आहे. त्या ठिकाणी ग्राहक केंद्रित आणि जमाखर्चाच्या ताळेबंदाचा समन्वय साधत कॅश फ्लोची अखंडता साधली जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरांची गरज असलेल्या नागरिकांसाठी केवळ सदनिका उपलब्ध करून न देता नवनिर्मिती आणि नावीन्याचा मिलाप असणारे आपुलकीचं घर निर्माण करणारे बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळख असलेली ‘कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड’ (केपीडीएल) ही देशातील एक नावाजलेली कंपनी असून गृहनिर्माण करणारी देशातील एक अग्रगण्य कंपनी अशी ओळख गेल्या तीन दशकातील कारकिर्दीत कंपनीने उभी केली. कंपनी फक्त ‘बांधकाम नसून नवनिर्मिती करणारी संस्था’ या तत्वावर प्रामुख्याने काम करते. (Creation, not Construction) पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या केपीडीएलचे कार्यक्षेत्र देशभर पसरले आहे.

Image may contain: 1 person, text

ग्राहकांशी झालेल्या घरोब्यातून कंपनीने पुणे, मुंबई आणि बंगळुरूमध्ये आपले प्रस्थ स्थापित केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी पुण्यातील नेतृत्व अनुभवत आहे. या तीनही शहरांत कंपनीने वीस दशलक्ष चौरस फुटाहून अधिक घरांचे बांधकाम ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. स्वतःच्या फायद्यापेक्षा ग्राहक हिताचा विचार करत कंपनी सातत्याने विस्तारत चालली आहे. सद्यःस्थितीत बांधकाम क्षेत्राला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत 'केपीडीएल'ची मागील चार आर्थिक वर्षांपासून (2017-20) वाढ झाली आहे. PAT 87 वरून 137 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. तर महसुलात 965 कोटीवरून 1226 कोटींपर्यंत वाढ झाली आहे. या काळातील कलेक्शन 965 कोटीवरून 1368 कोटींपर्यंत वाढले आहे. ही कंपनीच्या इतिहासातील सर्वाधिक वाढ आहे. याशिवाय या कालावधीत कंपनी 2.1 ते 2.7 दशलक्ष चौरस फुटावर बांधलेली घरे विक्री करत आहे. तर दरवर्षी दोन दशलक्ष चौरस फूट बांधकाम ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे.

केपीडीएल संपत्ती निर्मितीतील दिपस्तंभ -
कंपनीने भांडवलाचे योग्य व्यवस्थापन, वेळेत अंमलबजावणी, नफा-खर्चाच्या सुधारणावादी व्यावसायिक आराखड्यानुसार भांडवलाचे योग्य वितरण केले. ही लक्षात घेण्यासारखी प्रगती होत असताना कर्जामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. किंबहुना ती कमी झाली. 2020 या आर्थिक वर्षात कर्ज इक्विटीच्या 0.35x होते. याचा परिणाम ROCE परताव्यावर होऊन ते पंधरा टक्के झाले आहे. तसेच कंपनीने गृहनिर्माण क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या क्रिसिसचा (CRISIL) A+ दर्जा मिळवला आहे.

केकेआर, जेपी मॉर्गन अॅसेट मॅनेजमेंट, पोर्टमन होल्डिंग्ज, एएसके कॅपिटल, मोतीलाल ओसवाल आणि आयसीआयसीआय व्हेंन्चर्स यांच्याबरोबर आर्थिक भागीदारी वाढविण्यात आली आहे.

कामाचा सर्वोच्च दर्जा आणि व्यावसायिक पद्धती -
नाविन्यता, त्याची उत्कृष्ट अंमलबजावणी, कामाचा दर्जा व कामाचे टिकाऊपण म्हणजेच ‘कोलते पाटील’ ब्रँड आहे. कंपनीच्या स्थापनेपासून हा ब्रँड सातत्यपूर्ण लोकप्रिय होत आहे. भविष्यकाळात विविध प्रकल्पांचे काम ‘कोलते पाटील’ ब्रँडच्या माध्यमातून शाश्‍वत स्वरुपाचे राहिल. या प्रकल्पाचे भौगोलिक ठिकाण व त्याची विभागवार रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे.  

अफोर्डेबल, मध्यमवर्गीयांना अपेक्षित (एमआयजी), लक्झरी (24K), व्हिलाज, टाऊनशिप, रिडेव्हपमेंट, ऑफिस आणि रिटेल क्षेत्रांत कंपनीचा हातखंडा आहे. बांधकाम व्यवसायात कंपनी पुण्यात अग्रगण्य असून, मुंबई आणि बंगळूरमध्येही तिची वाढ होत आहे. बंगळूरमधील प्रकल्पांच्या बुकिंगमध्ये गेल्या काही वर्षांत तिप्पट वाढ झाली असून, मुंबईत अनेक ठिकाणी पुनर्विकासाचे प्रकल्प हाती घेतले आहेत.

संपूर्ण क्षमता -
कंपनी समग्र कार्यक्षमतेने चालावी असा व्यवस्थापनाचा आग्रह असतो. त्यामुळे बांधकाम, वेळेची योग्यता, विक्री, ग्राहक संबंध, अत्याधुनिक तंत्रज्ञानातील गुंतवणूक, चांगली कार्यप्रणाली योग्य निर्णय घेण्याची क्षमता या बाबींवर कंपनीचा भर असतो. केपीडीएल मानवी भांडवलावर लक्ष केंद्रित करून आहे. आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमधून उत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कंपनी त्यांच्या व्यवस्थापकांना उद्योजकांप्रमाणे प्रेरित करून अधिकार सक्षम बनवते. ग्राहकांना कमीत-कमी वेळेत सेवा पुरवण्यासाठी कंपनीने तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक केंद्रित व्यवस्था (CRM) निर्माण केली आहे. रेरा अनिवार्य होण्यापूर्वीच कंपनी रेराच्या नियमानुसार काम करत होती. 

रेरा लागू झाल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली. ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा पुरवण्यासाठी कंपनीने कोरिया, इटली, जर्मनी आणि जपानमधील नावाजलेल्या कंपन्यांत बरोबर तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक केली आहे. भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात प्रगत सीआरएम एसएपी आधारित ईआरपी राबविणारी ‘कोलते पाटील’ पहिल्या काही कंपन्यांमध्ये होती.

ग्राहकांसाठी आमचे पाऊल पुढे!
लॉकडाउननंतर आम्ही आमच्या कार्यसंस्कृतीत मोठे बदल घडवून आणले आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांशी डिजिटल व व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरक्षितपणे संवाद साधत आहोत. येत्या वर्षभरामध्ये पुण्यात दोन हजार कोटींचे, तर मुंबईत अकराशे कोटींचे नवे प्रकल्प सुरू करत आहोत.

अधिक माहितीसाठी : 18002666654
Website : www.koltepatil.com

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of Pune Kolte Patil