लेव्हिटेट एलेवेटर्स : अत्याधुनिक आणि आकर्षक लिफ्टसाठी

Levitate Elevators
Levitate Elevators

लेव्हिटेट एलेवेटर्स ही श्री. गौरव नाईक यांनी स्थापन केलेली कंपनी आजमितीला विविध प्रकारच्या लिफ्ट्स बनविणारी एक प्रमुख भारतीय कंपनी म्हणून गणली जाते. हायड्रॉलिक, गिअर्ड किंवा गिअरलेस आणि मशीन रूम अथवा मशीन रूमलेस अशा पाच प्रकारात ही कंपनी होम, पॅसेंजर, हॉस्पिटल, कार व गुडस् लिफ्टचे उत्पादन करते. प्रामुख्याने बंगले आणि व्हिला यासाठी लागणाऱ्या लिफ्टसाठी लेव्हिटेट हे नाव विशेष प्रसिद्ध आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंपनीतर्फे ग्राहकांच्या गरजेनुसार कस्टमाइज्ड आणि टेलर-मेड लिफ्टचे उत्पादन केले जाते. विदेशातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, भारतीय ग्राहकांना सर्वोत्तम देण्याचा कंपनीचा नेहमीच प्रयत्न असतो. तुमची जागा कशीही असो, त्याला अनुसरून लेव्हिटेट लिफ्ट बनवितात. खास करून बंगले व व्हिला यासाठी लिफ्ट बनविताना बंगल्याच्या रचनेनुसार व मागणीनुसार लेव्हिटेट लिफ्टस् बनवित असल्यामुळे आज अनेक नामवंत आर्किटेक्टस् आणि बिल्डर्स लेव्हिटेट लिफ्टला प्रथम पसंती देतात. या साऱ्‍या वैशिष्ट्यांमुळेच विख्यात सिने-निर्माता विधू विनोद चोप्रा आणि इतर अनेक मान्यवर लेव्हिटेटचे सन्माननीय ग्राहक आहेत.

अतिशय स्मूथ कंपनविरहित रनिंग, दीर्घकाळ चालणारी, अत्याधुनिक, सुटसुटीत, उभारणीला एकदम सोपी अशी अन्य वैशिष्ट्ये असलेल्या लेव्हिटेट लिफ्टचा देखभाल खर्चदेखील अतिशय माफक आहे. कंपनीतर्फे लिफ्टची दुरुस्ती तसेच आधुनिकीकरण आणि वार्षिक देखभाल करार याही सेवा पुरविल्या जातात. अन्य कंपन्यांच्या लिफ्टसाठीही लेव्हिटेटतर्फे योग्य दरात वार्षिक देखभाल करार केले जातात. कंपनीचे कॉर्पोरेट ऑफिस पुण्यात बिबवेवाडी येथे आहे.  

लिफ्टसारखी साधी वाटणारी गोष्टसुद्धा लेव्हिटेटमुळे इतरांपेक्षा आकर्षक होऊ शकते आणि अत्यंत माफक किमतीत ग्राहकांना आधुनिक काळानुसार, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव निश्चितपणे मिळतो.

अधिक माहितीसाठी संपर्क :  ९६८९६ ६१०५८
ई मेल आय डी :   levitateelevators@gmail.com       
वेबसाईट : www.levitateelevators.com

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com