पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट : गुणवत्तापूर्ण व्यावसायिक शिक्षणाच्या संधी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

पुण्यातील तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणारी अग्रणी संस्था, उत्तम गुणवत्तेचे प्लेसमेंट, शिस्तबद्ध शिक्षणासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (PCET) चा महाराष्ट्राबरोबर देशात देखील नावलौकिक आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीच्या विकासात या संस्थेने दिलेले योगदान अतुल्य आहे. आता केजीपासून डॉक्‍टरेटपर्यंत या संस्थेतून १०,००० ते १२,००० विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत आहेत.

पुण्यातील तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणारी अग्रणी संस्था, उत्तम गुणवत्तेचे प्लेसमेंट, शिस्तबद्ध शिक्षणासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (PCET) चा महाराष्ट्राबरोबर देशात देखील नावलौकिक आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीच्या विकासात या संस्थेने दिलेले योगदान अतुल्य आहे. आता केजीपासून डॉक्‍टरेटपर्यंत या संस्थेतून १०,००० ते १२,००० विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत आहेत. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव बाजीराव पाटील असून त्यानंतर कै. लीलाताई शंकरराव पाटील यांनीही अध्यक्षपद भूषविले. सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे हे विद्यमान अध्यक्ष आहेत. तर पद्माताई भोसले (उपाध्यक्षा), विठ्ठल काळभोर (सचिव), शांताराम गराडे (कोषाध्यक्ष) तर विश्वस्त म्हणून हर्षवर्धन पाटील काम पाहत आहेत. शैक्षणिक संकुलांचे व्यवस्थापन डॉ. गिरीश देसाई करीत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

PCET च्या शैक्षणिक संस्था -  
१)  पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक (PCP)
२) पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (PCCOE)
३) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय (PCCOER)   
४) पुणे बिजनेस स्कुल (PBS) 
५) एस. बी. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट  (SBPIM)
६) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन (SBPCOAD) 
७) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स (SBPCSC) 
८) एस. बी. पाटील पब्लिक स्कूल (SBPPS)
  Institutes Under Management Support by PCET
९) नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेकनॉलॉजी (NMIET)
१०) नूतन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च (NCER)

Image may contain: sky and outdoor, text that says "Engineering Diploma MBA MCA Architecture Junior College CBSE School (Approved AICTE, DTE S. P.Pune University, DBATU) B. Voc. PhD (Engg./ Mang.) 23,000 ,000+ PLACEMENTS 450+ PATENTS 2,500 RESEARCH PAPERS 46,500+ ALUMNI"  

संस्थेची प्रमुख वैशिष्ठे -

  • NAAC, NBA व  NABET प्रमाणित संस्था. 
  • आताच संस्थेच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयास (PCCOE) युजीसीने स्वायत्तता प्रदान केली आहे. 
  • NIRF मध्ये सलग ४ वर्षां पासून पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (पीसीसीओई) देशातील पहिल्या २०० अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये समावेश केला गेला आहे. 

प्लेसमेंट मधील नेत्रदीपक कामगिरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आजतागायत सुमारे २३,००० विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत. पीसीसीओई, पीसीसीओईआर व नूतन या तीन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या वर्षीच्या अंतिम वर्षातील १,२७५ विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत १,०२२  नोकऱ्या मिळाल्या आहेत. काही कंपन्या व त्यांनी दिलेल्या नोकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे : Capgemini (२०७), Accenture (१२८), KPIT (५९), TCS (५०), Persistent (४६) इत्यादी.  रोजगाराच्या संधी दिलेल्या काही  कंपन्या व त्यांनी दिलेले वार्षिक पगार पुढील प्रमाणे : Amazon (२८ लाख), VMware (१० लाख), Quantifi (९.५ लाख), SAP Lab (८.२५ लाख), Josh Technologies (८ लाख), TIAA (७ लाख) इत्यादी. 

अधिक माहितीसाठी www.PCET.org.in या संकेत स्थळाला भेट द्या. 
संपर्क :
९९७५०६७००६, ९९६०८५९०६४, ८३०८८१०७२१

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of Pune Pimpri Chinchwad Education Trust