‘टी एम्पोरियम’! : एक कप चहाची चव 

Tea-Emporium
Tea-Emporium

स्वर्गीय श्री. चुनीलाल वीरजी शहा यांनी १९२३ मध्ये सर्व प्रथम चहाच्या होलसेल व्यवसायाची सुरुवात पुणे शहरात केली होती. त्याकाळी त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून रेल्वेच्या वॅगनद्वारे निलगिरी आणि आसाममधून चहा पुण्यात मागवून, संपूर्ण पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात त्याचा पुरवठा करत होते. त्याकाळी त्यांनी पुण्यातील एकमेव चहाचे होलसेल व्यापारी म्हणून प्रसिद्धी मिळवली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चहाचा माल पुण्यात आल्यावर सर्व व्यावसायिक जास्त मालासाठी मागणी करत असत तरीसुद्धा आमच्या आजोबांचा कल हा फक्त सर्व नामांकित मोठ्या व्यापाऱ्यांना चहाचा पुरवठा करणे नव्हता तर सर्व लहान-सहान व्यापाऱ्याच्या हिताला त्यांनी तेवढेच प्राधान्य दिले होते, असे टी एम्पोरियमच्या तिसऱ्या पिढीतील नितीन शहा अभिमानाने सांगतात.

आज त्यांची चौथी पिढी हा वारसा यशस्वीपणे पुढे चालवत आहे. गेल्या ९७ वर्षांपासून ते त्यांच्या मान्यवर ग्राहकांना उत्तम प्रतीच्या चहाचा पुरवठा अखंडपणे करत आहेत. ग्राहकांच्या सेवेसाठी त्यांनी पुणे शहरात सिटी पोस्ट चौक, टिळक रोड, शनिपार, नेहरू चौक, हडपसर, कोथरूड आणि  खडकमाळ आळी या सहा ठिकाणी शाखा सुरू केल्या आहेत. या सर्व ठिकाणी त्यांनी स्वतःची फक्त चहाची दुकाने सुरू केली आहेत. येथील विविध प्रकारच्या चहांची माहिती देताना चौथ्या पिढीचे प्रतिनिधी श्री. प्रतीक शहा सांगतात, ‘ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही विविध ब्लेन्डसचा पुरवठा करतो, जेणेकरून ग्राहकांना उत्तमोत्तम चहाच्या चवींचा आनंद लुटता येतो.’ चहाच्या पुरवठ्याबद्दल माहिती देताना श्री. प्रतीक शाह यांचे वडील श्री. नितीन शहा म्हणतात, ‘‘आमचा चहा हा आसाममधील चहाचे मळे आणि चहाच्या सरकारी मालकीच्या लिलावांतून खरेदी केला जातो. त्याद्वारे नैसर्गिक चहाच्या स्वादाचा आनंद आम्ही आमच्या पुण्यातील असंख्य ग्राहकांना वर्षानुवर्षे देत आहोत.’’

त्याचबरोबर ‘निलगिरी टी’ आणि ‘ग्रीन टी’सुध्दा’ ते आपल्या चोखंदळ ग्राहकांना पुरवतात. सी. टी .सी. (CTC – Crushed Tear Curl) ज्यामध्ये चहाची पाने क्रश करून कारखान्यात हीट प्रोसेसने गोळी चहा बनवला जातो. या प्रोसेसबद्दल माहिती देताना श्री. प्रतीक शहांनी आवर्जूनपणे नमूद केले की, ‘‘वाळलेली चहाची पाने कमीत कमी उष्णता दिल्यामुळे ग्राहकांना चहाच्या सुगंधाचा सर्वाधिक आस्वाद घेता येतो. जसे चहाची पाने, गोळी चहा आणि पावडर चहामध्ये चहाचा सुगंध आणि चहाचा घट्टपणा यांचा प्रत्येक ग्राहकास आपापल्या आवडीनुसार आणि प्रमाणानुसार निवडून आनंद घेता येतो.’’ 

टी एम्पोरियमच्या विविध प्रकारच्या चहाच्या ब्रॅंड्सबद्दल माहिती देताना श्री. नितीन शहा म्हणाले, ‘‘आमचा सर्वांत लोकप्रिय, प्रीमियम ब्रँड ‘इंडियन रॉयल’ हा असून मध्यमवर्गाला आवडेल असा ‘आसाम गोल्ड’ ब्रँड आहे. त्याशिवाय फॅमिली मिक्श्चर, गोल्डन डस्ट, स्पेशल सी. टी. सी., सुप्रीम मिक्श्चर, सुप्रीम डस्ट, सुप्रीम सी. टी. सी. हे प्रमुख ब्रँड्स ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत, जेणेकरून ग्राहकांना आपल्या आवडीचा चहा योग्य किमतीत मिळाल्याचा आनंद घेता येतो.’’ त्यांच्या म्हणण्यानुसार, चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन हे दोन्ही घटक असतात, ज्यामुळे शरीराला आवश्यक अँटिऑक्सिडंट्स मिळतात. या पदार्थांमुळे शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनला मदत होते. ‘टी एम्पोरियम’च्या ग्रीन टीचे फायदे त्यांच्या असंख्य फिटनेस फ्रिक ग्राहकांना सर्वश्रुत आहेत.

त्यांच्याकडे ‘ऑर्थोडॉक्स टी’ हा चहाचा विशेष प्रकार आहे, जो मशीनचा कमीत कमी वापर करून जुन्या पारंपरिक पद्धतीने बनवला जातो. काही चोखंदळ ग्राहक वर्ग या चहाचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून भेट देण्यासाठी येतात. युवा पिढीतील प्रतीक शहा व्यवसायातील नवीन संकल्पनांबद्दल बोलताना म्हणाले की, आता आम्ही काही विशेष वजनाचे LDPP पॅकेजिंग सुरू केले आहे, जेणेकरून कमीत कमी मानवी स्पर्शाद्वारे चहा ग्राहकांपर्यंत पोहचावा आणि आम्ही लवकरच ऑनलाइनच्या पर्यायाचा विचार करत आहोत. ग्राहकांच्या सोयीसाठी ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याचा मोबाइल नंबर ७७०९ ५६७८९० हा आहे.

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com