जेव्हा मंंडपात होते वधूचे हेलिकॉप्टरने आगमन...

राजकुमार थोरात
Sunday, 1 December 2019

- आमदार दत्तात्रेय भरणे व आमदार यशवंत मानेही विवाहासाठी आले हेलिकॉप्टरने...

वालचंदनगर : बेलवाडी (ता.इंदापूर) येथे नवरीमुलीची विवाह समारंभासाठी हेलिकाॅप्टरमधून एंट्री झाली. तसेच आमदार दत्तात्रेय भरणे व आमदार यशवंत मानेही विवाह समारंभासाठी हेलिकॉप्टरमधून आले होते. नवरीमुलीची हेलिकॉप्टरने एंट्री झाल्याने सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.

डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार यांचा चिरंजीव अक्षय याचा आज रविवार (ता.1) रोजी बेलवाडी गावामध्ये विवाहसमारंभ होता. अक्षयचा विवाह करमाळा तालुक्यातील बिटरगावमधील शिवाजीराव नामदेव पाटील यांची कन्या स्नेहलसोबत आहे. या विवाह समारंभासाठी स्नेहलचे आगामन बिटरगावमधून आज सकाळी हेलिकॉप्टरने झाले.

Image may contain: 2 people, people smiling, people standing and outdoor

देवेंद्र फडणवीसच विरोधीपक्ष नेते

बेलवाडी गावमध्ये हेलिकॉप्टर आल्यानंतर नागरिकांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली होती. तसेच आज मुंबईमध्ये अधिवेशन सुरु होते. आज इंदापूर तालुक्यामध्ये अनेक विवाहसमारंभ होते. सुवर्णयुग पतसंस्थेचे अध्यक्ष दशरथ डोंगरे यांचा मुलगा प्रवीण यांचाही सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विवाह होता. जामदार व डोंगरे यांच्या विवाहासाठी आमदार दत्तात्रेय भरणे व आमदार यशवंत माने मुंबईहून हेलीकॉप्टरने आले.

Image may contain: one or more people, sky and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bride Reached on Wedding Event with Helicopter