वाकडचा पूल वाहतुकीसाठी खुला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुळा नदीवर हा पूल बांधला आहे. चार ऑगस्टला झालेल्या पावसामध्ये मुळा नदीचे पाणी या पुलावर आल्याने तेथील भराव खचला होता. त्यामुळे दहा दिवस हा पूल दुरुस्तीच्या कामासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला.

पिंपरी : मुळा नदीवरील वाकडचा पूल पुराच्या पाण्यामुळे खचला होता. त्याच्या दुरुस्तीचे काम आता पूर्ण झाले असून, पूल बुधवारी (ता. 14) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 

हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुळा नदीवर हा पूल बांधला आहे. चार ऑगस्टला झालेल्या पावसामध्ये मुळा नदीचे पाणी या पुलावर आल्याने तेथील भराव खचला होता. त्यामुळे दहा दिवस हा पूल दुरुस्तीच्या कामासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, पूल बंद असणाऱ्या काळात हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहनांना महामार्गाचा वापर करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. दोन वर्षांपासून या पुलाच्या उभारणीचे काम सुरू होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bridge open for transport