पुलांची केवळ किरकोळ डागडुजी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पुणे - वाहतूक प्रचंड असलेल्या शहरातील दहा पुलांची रीतसर दुरुस्ती करून ते सुरक्षित करणे अपेक्षित असताना महापालिका प्रशासनाने केवळ डागडुजी केली आहे. दुसरीकडे या पुलांच्या ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’करिता तब्बल ३२ लाख रुपये मोजण्यात आले असून, सल्लागाराने सुचविल्यानुसार कामे झाल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हे पूल सुरक्षित आहेत का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पुलांची नेमकी दुरुस्ती करण्यात आली असून, ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. प्रत्यक्षात या कामांचा अहवाल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यास संबंधित खात्याकडून टाळाटाळ केली जात आहे. 

शहर आणि परिसरात ३० पूल असून, त्यातील दहा पूल जुने झाले आहेत. गेल्या काही वर्षांत या पुलांवरील वाहतूक वाढल्याने ते धोकादायक झाल्याचे दोन वर्षांपूर्वी आढळून आले. त्यामुळे या पुलांची देखभाल- दुरुस्ती करण्याची योजना महापालिकेने आखली. त्याकरिता अर्थसंकल्पात तरतूद केली आहे; पण ही कामे वेळेत होऊ शकलेली नाहीत. 

गेल्या वर्षी काही शहरांमध्ये पावसामुळे पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या, त्यामुळे पुण्यातील पुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा पुलांचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करण्यात आल्याचे महापालिकेच्या वाहतूक विभागाने सांगितले. त्यानुसार पुलांच्या मजबुतीकरणाची कामे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, किरकोळ स्वरूपाची डागडुजी करण्यापलीकडे महापालिका आणि ठेकेदारांनी काहीही केलेले नाही, त्याकरिता महापालिकेच्या अर्थसंकल्पातही जवळपास दहा कोटींची तरतूद करण्यात आली होती. याशिवाय, वर्गीकरणाद्वारेही निधी मिळविण्यात आला. मात्र, ती कामे होत नसल्याची ओरड पुन्हा करण्यात आली.

सल्लागाराला ३२ लाख
तेव्हा विविध भागांतील १३ पुलांच्या पाहणीसाठी सल्लागार नेमण्यात होता, त्याला ३२ लाख रुपये मोजण्यात आले होते. डेक्कन येथील बाबा भिडे, संगम पूल (जुना), होळकर पूल, पौड रस्त्यावरील सावरकर पूल यासह बंडगार्डन, पर्वती पायथा येथील पुलांचा पाहणीत समावेश आहे. 

वाहनांची वर्दळ असलेल्या पुलांची दुरुस्ती करण्यासाठी पाहणी करण्यात आली. त्यानुसार निधी मंजूर करण्यात आला होता. ती कामे झाली आहेत. त्याबाबतचा अहवाल मागविण्यात येईल.
- योगेश मुळीक, अध्यक्ष, स्थायी समिती

Web Title: Bridge Repairing Municipal