परदेशातील भारतीयांना परत आणावे - विजय गोखले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पुणे - ‘देशातील खासगी क्षेत्राने इतर देशांमध्ये स्थित असणाऱ्या अनिवासी भारतीयांना परत आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे,’’ असे मत परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी व्यक्त केले. 

सिंबायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या वतीने ‘भारताच्या नव्या सामरिक संस्कृतीला आकार देणे’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.

या परिषदेत गोखले यांनी विचार मांडले. या वेळी सिंबायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते उपस्थित होते. 

‘आपल्याकडे चाकोरी बाहेर विचार करण्याची क्षमता आहे. ही क्षमता इतर देशातील लोकांकडे अभावानेच पाहायला मिळते. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने विकासकामांत महत्त्वाची भूमिका बजावणे आवश्‍यक आहे. नव्या सामरिक संस्कृतीला आकार देण्यासाठी सर्व स्तरावर चर्चा करण्याची गरज आहे,’’ असेही गोखले यांनी सांगितले.

Web Title: Bringing Indians back home Vijay Gokhale