Lifetime Achievement Award : ब्रिटिशांनी आपली शैक्षणिक परंपरा नष्ट केली; डॉ. प्रभाकर मांडे

डॉ. प्रभाकर मांडे; चतुरंग प्रतिष्ठानतर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान
British destroyed educational tradition Dr Prabhakar Mande Awarded Lifetime Achievement Award
British destroyed educational tradition Dr Prabhakar Mande Awarded Lifetime Achievement Awardsakal

पुणे : ‘‘भारताला समृद्ध अशी शैक्षणिक परंपरा होती, परंतु ब्रिटिशांनी ही परंपरा नष्ट केली आणि आपल्यात न्यूनगंड निर्माण केला. हा सगळा इतिहास वाचण्याची आवश्यकता आहे. नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला विद्येच्या परंपरेला जागे करण्याच्यादृष्टीने अत्यंत लाभदायक आहे. त्यादृष्टीने धोरणाकडे पाहणे गरजचे आहे,’’ असे मत ज्येष्ठ लोकसाहित्यकार डॉ. प्रभाकर मांडे यांनी व्यक्त केले.

चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने लोकसाहित्याचे लेखन केलेल्या डॉ. मांडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी डॉ. मांडे बोलत होते. पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्र सरकारच्या सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, पुरातत्वशास्त्राचे तज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. अरविंद जामखेडकर, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, दा.कृ सोमण, अभिनेता आरोह वेलणकर आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानतर्फे आयोजित रंगसंमेलनात या पुरस्काराचे वितरण झाले.

डॉ. मांडे म्हणाले, ‘‘ब्रिटिशांनी आपली शैक्षणिक परंपरा नष्ट केली असून गेल्या काही वर्षांत उठून उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा काळात आपली शैक्षणिक परंपरा निर्माण करण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणाकडे पाहणे आवश्यक आहे.’’

लोकनाद’मध्ये वादन

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ‘लोकनाद’ हा वादनाचा कार्यक्रम झाला. यात सत्यजित तळवलकर (तबला), प्रताप पाटील (पखवाज), श्रीधर पार्थसारथी (मृदुंग), नवीन शर्मा (ढोलक), तन्मय देवचक्के (हार्मोनियम) यांनी कलाविष्कार सादर केला. तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन यांचा ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रम सादर झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com