सख्ख्या बहिण-भावाची आत्महत्या

सख्ख्या बहिण-भावाची आत्महत्या

राजगुरूनगर : अज्ञात कारणामुळे सख्ख्या बहिण-भावाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना डेहणे ( ता. खेड, जि. पुणे ) याठिकाणी गुरूवारी (ता. 17) घडली. रंजन गणपत भोपळे (वय 40) आणि शैला गणपत भोपळे (वय 38) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजन भोपळे हे बहीण शैलासह डेहणे येथे राहत होते. रंजन यांचे लग्न झालेले आहे, पण पत्नी सध्या त्यांच्याकडे राहत नव्हती. मात्र 38 वय होऊनही शैला यांचे लग्न झालेले नव्हते. डेहणे गावातच राहणाऱ्या आणि या दोघांची थोरली बहीण असलेल्या लक्ष्मीबाई तुकाराम कशाळे या बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना भाऊ आणि बहीण निपचित पडलेले दिसले. दोघांच्याही तोंडातून फेस येत होता. त्यावरून दोघांनीही विषारी औषध घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. गावकऱ्यांनी दोघांनाही उपचारासाठी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यांचा भाचा संतोष तुकाराम कशाळे यांनी याबाबत खेड पोलीस ठाण्यात खबर दिली.

त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. मात्र नैराश्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा कयास आहे. लग्न जमत नसल्याने आत्महत्या केल्याचे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले, पण अशी कोणतीही चिठ्ठी किंवा ठोस आधार आम्हाला मिळाला नसल्याचे फौजदार श्रीराम पडवळ यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com