शिंगव्यात आढळला तांबूस रंगाचा उंदीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

निरगुडसर - शिंगवे (ता. आंबेगाव) परिसरात इंडियन ॲन्टिलोप रॅट या प्रजातीच्या उंदराचे अस्तित्व आढळून आले आहे. हा उंदीर घर उंदरांपेक्षा थोडा मोठा असून, त्याचा रंग तांबूस व विटकरी असल्याची माहिती निसर्ग अभ्यासक गायत्री राजगुरू यांनी दिली.

हा उंदीर इतर उंदरांपेक्षा आकाराने रंगाने वेगळा आहे. त्याच्या पोटाकडील भाग आणि भुवया सफेद आहेत. शेपटाची लांबी शरीरापेक्षा मोठी असून, शेपटीच्या टोकाकडील भाग काळा केसाळ आहे. डोळे घर उंदरांपेक्षा मोठे व काळे असून तोंड आणि नाकाचा भाग निमुळता आहे. तसेच कान मोठे व उंच आहेत. या उंदराचे वास्तव्य भारतातील विविध पट्ट्यात असून, नेपाळ, अफगाणिस्तान, इराक व श्रीलंका येथे अस्तित्व आढळते. हा उंदीर निशाचर असून खाद्यासाठी रात्री बाहेर पडतो. याचे खाद्य झाडाच्या बिया, फुले, पाने, गवत, धान्य हे आहे.

Web Title: Brown color rat found in ambegaon taluka