हेल्दी ब्राऊन राईस खाताय? मग हे वाचाच...

Brown-Rice
Brown-Rice

पुणे - अलीकडच्या काळात नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढली आहे. मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी ब्राऊन तांदळाची मदत होत असल्याने या तांदळाची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. २०१४ ला बाजारात आलेला हा तांदूळ पहिल्या वर्षी २० टन विकला गेला होता, तर तो यंदा १०० ते १२० टनांपर्यंत पोचला आहे.

कमी प्रक्रिया केलेला आणि पॉलिश न केलेला हा तांदूळच आरोग्यासाठी उत्तम आहे. या तांदळाला सुरुवातीला भारतापेक्षा परदेशात जास्त मागणी होती. परदेशात ब्राऊन तांदळाचा ट्रेंड सुरू झालेला पाहून भारतातही हळूहळू त्याची मागणी वाढत गेली. 

२०१४ रोजी ब्राऊन तांदळाची पुण्यात आवक सुरू झाली. सुरुवातीच्या काळात ग्राहकांना ब्राऊन तांदळाचे महत्त्व माहीत नव्हते. त्यामुळे त्याची आवक जेमतेम होती. परंतु, आरोग्याच्या दृष्टीने जशी लोकांमध्ये जागरूकता वाढत गेली तशी त्यात वाढ होत गेली. घाऊक बाजारात हा तांदूळ दर्जानुसार प्रतिकिलो १०० ते १२० रुपये, तर किरकोळ बाजारात १२० ते १३० रुपये प्रतिकिलो विकला जातो, अशी माहिती मार्केट यार्डातील तांदळाचे व्यापारी राजेश शहा 
यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com