esakal | बीआरटीच्या धोरणाचा आयुक्त घेणार आढावा

बोलून बातमी शोधा

Pune-Municipal

शहरात राबविण्यात येत असलेल्या बीआरटी प्रकल्पाचा धोरणात्मक आढावा घेऊन त्याबाबतच्या उपाययोजना निश्‍चित करण्याची भूमिका महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी मांडली. तसेच बीआरटीबाबतची दुसरी बैठक येत्या पंधरा दिवसांत घेण्याचेही आश्‍वासन त्यांनी दिले.

बीआरटीच्या धोरणाचा आयुक्त घेणार आढावा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात राबविण्यात येत असलेल्या बीआरटी प्रकल्पाचा धोरणात्मक आढावा घेऊन त्याबाबतच्या उपाययोजना निश्‍चित करण्याची भूमिका महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी मांडली. तसेच बीआरटीबाबतची दुसरी बैठक येत्या पंधरा दिवसांत घेण्याचेही आश्‍वासन त्यांनी दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेने नियुक्त केलेल्या बीआरटी समितीची बैठक गायकवाड यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच सोमवारी झाली. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यावर गायकवाड यांनी बीआरटीचा फेरविचार करण्याची भूमिका मांडली होती. या पार्श्‍वभूमीवर झालेल्या बैठकीत बीआरटीची उपयुक्तता, त्यासाठी यापूर्वी झालेली प्रक्रिया, शहरांचा सर्वंकष वाहतूक आराखडा (सीएमपी), बीआरटीला प्रवाशांचा मिळालेला प्रतिसाद, बीआरटीचे विस्तारीकरण आणि सक्षमीकरण या बाबतच्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली.

पुण्यासह राज्यात उन्हाचा चटका 

या वेळी आयुक्तांनी बीआरटीबाबत पीएमपीकडे असलेल्या धोरणाची मागणी केली; परंतु निश्‍चित धोरण नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आयुक्तांनी बीआरटीचे धोरण आणि त्याबाबतचा आढावा घेण्यासाठी निश्‍चित आराखडा हवा, असे मत व्यक्त केले. या वेळी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी त्याबाबतचा आराखडा तयार करण्याची तयारी दर्शविली. आयुक्तांनीही आराखडा तयार झाल्यावर बीआरटीबाबत पुढील निर्णय घेऊ आणि त्यासाठीची बैठक १५ दिवसांत घेऊ, अशी ग्वाही दिली.  सुजित पटवर्धन, रणजित गाडगीळ, हर्षद अभ्यंकर, संस्कृती मेनन, प्रांजली पटवर्धन व अधिकारी उपस्थित होते.