‘बीआरटी’ करताय पण प्रवासी पोचणार कसे

गुरुवार, 10 मे 2018

पुणे - सातारा रस्त्याची पुनर्रचना करण्यासाठी ७५ कोटी रुपये खर्च केले जात असले, तरीही यात ‘पादचारी’ या घटकाला कुठेच स्थान मिळालेले नाही. ‘पादचाऱ्यांसाठी नव्हे, तर वाहनांसाठी रस्ता’ हा समज अधोरेखित होत आहे. सातारा रस्त्यावरील ‘बस रॅपिड ट्रान्झिट’च्या (बीआरटी) मार्गावरील थांब्यांपर्यंत पोचण्यासाठी प्रवाशांना रस्त्यावरच्या वाहनांशी झुंजावे लागणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

कात्रज चौक ते स्वारगेट या टप्प्यात रस्त्याच्या फेररचनेस २०१७ च्या जानेवारीत सुरवात झाली. हे काम २ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. ‘सकाळ’च्या पाहणीनुसार, कामाचा वेग पाहता ते ७ महिन्यांत पूर्ण होणे अवघड आहे. ‘बीआरटी’ मार्गातील थांबे चौकाजवळ असणे आणि पादचारी सिग्नल या बाबींकडेही दुर्लक्ष झाले आहे.

पादचारी असुरक्षित
‘बीआरटी’ मार्गावर बस थांबे चौकापासून दूर
थांब्यापर्यंत पोचण्यासाठी काही ठिकाणी २२ मीटर अंतर कापावे लागणार
रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी सिग्नलचे नियोजन नाही
बॅरिकेड्‌सची रचना वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी धोकादायक

रस्त्याच्या मध्यभागी बसथांबे
‘बीआरटी’च्या मार्गात पूर्वी रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूस बसथांबे होते. आता हे थांबे मार्गाच्या मध्यभागी असतील. त्यामुळे उजव्या बाजूला दरवाजे असलेल्या बस या मार्गावर धावतील. पूर्वी बसथांबे चौकाजवळ होते. सिग्नलमुळे रस्ता ओलांडणे पादचाऱ्यांना शक्‍य होत होते. आता थांबे चौकापासून पुढे गेल्याने रस्ता ओलांडणे खडतर होईल.

(क्रमशः)

Web Title: BRT road to vehicles not for pedestrians