बीआरटी मार्ग ओलांडायचाय तर इलेक्‍ट्रॉनिक ‘बझर’ दाबा

Electronic-Buzzer
Electronic-Buzzer

पिंपरी - दापोडी ते निगडी बीआरटीसाठी पीएमपीने सुरू केलेल्या बीआरटी मार्गावर पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आता इलेक्‍ट्रॉनिक ‘बझर’ वाजणार आहे. ज्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याची भीती वाटते, त्यांना या बझरमुळे रस्ता ओलांडण्यास मदत होईल. 

दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नाशिक फाटा, वल्लभनगर, पिंपरी, मोरवाडी, एम्पायर इस्टेट, चिंचवड, काळभोरनगर, आकुर्डी, बजाज चौक, निगडी अशा तेरा ठिकाणी ही सेवा सुरू केली आहे. त्यानंतर शहरात सर्व बीआरटी मार्गावर हे ‘बझर’ बसविण्यात येणार आहेत. ही सेवा ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, अपंग आणि बीआरटीच्या प्रवाशांसाठी आहे. तसेच, वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास वाहनांसाठीही सेवेचा वापर केला जाणार आहे. वाहतूक पोलिस, सुरक्षारक्षक आणि वाहतूक मार्गावरील वॉर्डन यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याला एसओएस (सेव्ह अवर सोल) प्रणाली असे म्हणतात. 
काय आहे ही सेवा बीआरटी मार्गावर ‘बझर’ म्हणजे गजर बसविले आहेत. रस्ता ओलांडताना ज्यांना भीती वाटते त्यांनी बझरचे बटण दाबायचे आहे. त्यानंतर हिरव्या रंगाचा पादचारी सिग्नल लागेल. बीआरटी मार्गावरील व सेवारस्त्यावरील सिग्नल रेड होईल आणि वाहतूक थांबेल. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सोपे होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com