नगरसेवक हट्टी; कोट्यवधींची उधळपट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पुणे - पुणेकरांकरिता सुपर फास्ट सावर्जनिक वाहतूक व्यवस्था पुरविण्याचे नियोजन करताना पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गालगतचा पदपथ आणि सायकल ट्रॅक उखडण्यात आला. ते खराब झाल्याने त्यांची पुर्नउभारणी करण्यात येत असल्याचे कारण दाखविण्यात आले. मुळात, दोन वर्षांपूर्वीच येथील पदपथ आणि सायकल ट्रॅकची दुरुस्ती करूनही ते का काढले? असा प्रश्‍न आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही नगरसेवकांच्या हट्टापायीच या मार्गाच्या बीआरटीचे ‘डिझाइन’ बदल्याचेही सांगण्यात आले. त्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.  

या मार्गावर उभारण्यात आलेल्या बसथांब्यांच्या खर्चाचे आकडे पाहता, त्याच्या बांधकामासाठी एका चौरस फुटाचा भाव तब्बल पाच हजार रुपये देण्यात आला आहे. तशी बिलेही काढण्यात आली आहेत. त्यामुळे हे काम महापालिकेतील अधिकारी-ठेकेदारांच्या भल्यासाठीच करण्यात आल्याची बाब दिसून येत आहे. त्याबाबत भाजपसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत.  

या मार्गाची पुनर्रचना करण्याची योजना प्रशासनाने मांडली. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ७० कोटी आणि आता ३० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. त्यात, ठराविक कामे घुसडण्यात आली. ही कामे वर्ष-दीड वर्षापूर्वीच झाली होती.

मात्र, बीआरटीच्या नावाखाली निविदा फुगविताना कामेही वाढवली. ज्या बसथाब्यांचा वापर होत नाही, त्याच्या उभारणीच्या खर्चाचे आकडेही वाढविल्याची तक्रार नगरसेवकांनीच केली. महापालिका आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘‘बीआरटी मार्गाचे जे काम सुरू आहे, ते तातडीने पूर्ण करण्यात येईल. ज्या कामांची आवश्‍यकता नाही, ती करण्यात आली आहेत का याबाबत माहिती घेण्यात येईल.’

सत्ताधाऱ्यांकडूनच सभेत विचारणा
एखाद्या प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च चौरस फुटामागे ३००० रुपये येतो, असे असताना बसथांब्यांची बिले का वाढविण्यात आली, अशी विचारणा सत्ताधारी भाजपचे नगरसेवक राजेश शिळीमकर यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. त्यापाठोपाठ अन्य नरगसेवकांनी तक्रारी केल्या. परंतु, याबाबत चौकशी करण्यापलीकडे प्रशासनाने काहीही केले नाही.

Web Title: BRT Route Work Issue Corporator Municipal Expenditure