बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पुणे - फोर जी सेक्‍ट्रमचे वितरण, निवृत्ती वेतनात सुधारणा यांसारख्या विविध मागण्यांचा पाठपुरावा बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी केंद्राकडे वारंवार केला; परंतु सेवासुविधा देण्याबद्दलचे आश्‍वासन केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने पाळले नाही. याचा निषेध नोंदवत 3 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) केंद्रीय, जिल्हा व विभागीय कार्यालयांसमोर कर्मचारी संघटनांमार्फत बुधवारी आंदोलन करण्यात आले. बाजीराव रस्ता येथील टेलिफोन भवनापासून लक्ष्मी रस्ता, टिळक चौक, टिळक रस्ता ते पुन्हा टेलिफोन भवनापर्यंत फेरी काढून कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला. 

या आंदोलनात ऑल युनियन्स ऍण्ड असोसिएशन्स ऑफ बीएसएनएलचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटनेचे महाराष्ट्र सर्कलचे सचिव नागेश नलावडे म्हणाले, ""खासगी टेलिकॉम सेक्‍टरला आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र बीएसएनएलला कोणतेच कर्ज नाही. असे असतानाही बीएसएनएलचे कर्मचारी सेवासुविधांपासून वंचित आहेत. म्हणूनच आम्ही बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.'' 

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या 
- 1 जानेवारी 2017 पासून "थर्ड पे रिव्हिजन' लागू करावा 
- फोर जी स्पेक्‍ट्रमचे त्वरित वाटप करावे 
- बेसिक पगारावर निवृत्ती वेतन वितरित करावे 
- 1 जानेवारी 2017 पासून सुधारित निवृत्ती वेतन द्यावे

Web Title: BSNL workers strike warning