Loksabha 2019 : बसपाचा 'वचननामा'  जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

पुणे : प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी, प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण, झोपडपट्टीतील नागरिकांना मोफत व हक्काचे घर, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एम्स दर्जाचे रुग्णालय, अशी आश्वासने बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) व समाजवादी पक्ष (सपा) या आघाडीच्या वचननामामध्ये देण्यात आले आहेत.

बसपा व सपा आघाडीचे उमेदवार उत्तम शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत हा वचननामा जाहीर केला. या वचननामामध्ये पुणे शहराची वाहतुक सुरळीत करणे, शहर साठी २४ तास पाणीपुरवठा, शहराची कायदा व सुव्यवस्था सुधारणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे. यासह ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण-तरुणी यांच्या समस्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

"पुणे शहराला 'स्मार्ट सिटी' घोषित करुन सरकारने पुणेकरांच्या डोळ्यात धुळफेक केली आहे," असे शिंदे म्हणाले. यावेळी बसप शहराध्यक्षक्ष सुदीप गायकवाड, सपाचे शहराध्यक्ष दिनेश यादव, प्रताप खरात, शेखर कुलकर्णी, संजय शेंडगे आदी उपस्थित होते
 
Web Title: BSP declares manifesto