बुद्धम्‌ सरणम् गच्छामि

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

पुणे  बौद्ध विहारांमध्ये सामूहिक वंदना, बागांमध्ये धम्म पहाटेनिमित्त बुद्धांवरील गीतांचे गायन व सांस्कृतिक कार्यक्रम, मानवी कल्याणाचा गौतम बुद्धांनी दिलेला संदेश यांसह सामाजिक उपक्रम राबवीत सोमवारी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

पुणे  बौद्ध विहारांमध्ये सामूहिक वंदना, बागांमध्ये धम्म पहाटेनिमित्त बुद्धांवरील गीतांचे गायन व सांस्कृतिक कार्यक्रम, मानवी कल्याणाचा गौतम बुद्धांनी दिलेला संदेश यांसह सामाजिक उपक्रम राबवीत सोमवारी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

भगवान गौतम बुद्धांच्या 2562 व्या जयंतीनिमित्त शहर व उपनगरांतील विहार परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. वेणूवन बुद्ध विहारात भाविकांनी त्रिशरण पंचशीलचे पठण केले. चतुःशृंगी वसाहतीतील आनंद यशोदा सोसायटीतील नालंदा बौद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक अशोक धिवरे यांनी गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा भारतीय संविधानात अंतर्भाव असून, मानव जातीचे कल्याण करणारा बौद्ध धम्म असल्याचे सांगितले. या प्रसंगी सामूहिक वंदना झाली. समाधान गुढदे व सहकाऱ्यांनी भीमगीते गायली. आनंद यशोदा मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष संजय मोरे, निमिषा पाटील, रमेश दुधगावकर, दिलीप खरात, विनोद लोंढे व सहकारी उपस्थित होते.

सम्राट अशोक सेनेतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बुद्ध विहार परिसरात पशुपक्ष्यांसाठी प्यायच्या पाण्याच्या पात्रे ठेवण्यात आली. भन्ते सुदस्सन, विनोद चव्हाण, नासिर खान, रमेश आढाव, संजय भोसले, नाना गायकवाड उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे "धम्म पहाट' कार्यक्रम झाला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पावा आणि जर्मन गायिका ऍडल यांच्या सुरेल आवाजातील भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित संगीतमय कार्यक्रमाने पुणेकरांची सकाळ मंगलमय झाली. "जैसा तू सोचेगा वैसाही पायेगा' हे गीत दाद मिळवून गेले. "सुख का घर तेरे अंदर, उसकी तलास बाहर ना कर' यांसारख्या संगीतमय गीतांनी उपस्थित्यांची मने जिंकली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, नगरसेविका सुनीता वाडेकर, दीपक म्हस्के उपस्थित होते.

लष्कर परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात शुभम युवा मंचातर्फे रुग्णांना; तसेच गरजू मुलांना फळे वाटप करण्यात आली. औंध रस्ता येथील भारिप बहुजन महासंघातर्फे अन्नदान करण्यात आले. सुभाष जोगदंड, दत्ता ओव्हाळ, मिलिंद खरात यांनी नियोजन केले.

Web Title: The Buddha Pournima celebrate