बजेट, सेंकडहोमसाठी तळेगावला पसंती

गणेश बोरुडे
गुरुवार, 24 मे 2018

तळेगाव दाभाडे - सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि इंद्रायणी नदीच्या कुशीत वसलेले तळेगाव दाभाडे शहर. दळणवळणासह अन्य सुविधांमुळे पुणे, मुंबई महानगरांशी जोडले गेल्याने साहजिकच सेकंड होमसाठी अनेकांची पावले तळेगावकडे वळत होती. आता तर दोन्ही शहरांचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून त्याला पसंती मिळत आहे.

मराठेशाहीतील दाभाडे सरकार घराण्याने तळेगावच्या विकासाची बीजे रोवली, असे इतिहास सांगतो. हिरवीगर्द वनराई, स्वच्छ मोकळी हवा आणि उदंड मिळणारा ऑक्‍सिजन यामुळे अस्थमा रुग्णांसाठी येथील हवामान अल्हाददायक आहे.

समुद्रसपाटीहून लोणावळ्यापेक्षाही अधिक उंचीवरील भौगोलिक ठिकाण असल्याने येथील हवेत गारवा असतो. हरणेश्‍वर आणि चौराईच्या टेकड्या सकाळ, सायंकाळी फिरायला उत्तम, त्यामुळे व्यायामही होतो आणि निसर्गसंचारही. जिमला जाण्याची गरजच भासत नाही. निर्मल शहर म्हणून गावाने बहुमान पटकाविला आहे. येथील नगरपालिकाही पुरेसा पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्यसेवा देण्याबाबत कटिबद्ध आहे. पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वे, महामार्ग आणि लोहमार्ग यामुळे तळेगावचे महत्त्व वाढले आहे. तसेच, प्रशस्त ग्रामीण रस्ते आणि पीएमपी (पुणे महानगर परिवहन महामंडळ) व एसटी बस यामुळे तळेगावची कनेक्‍टिव्हिटी वाढली आहे. तसेच, परिसरात विकसित झालेली औद्योगिक वसाहत, यामुळे आर्थिक उन्नतीचे कोंदणही तळेगावला लाभले आहे. येथील गढ्या व वाडे देदीप्यमान इतिहासाची साक्ष देत आहेत. त्याचबरोबरीने टोलेजंग गृहप्रकल्प उभे राहात आहेत. साहित्य व नाट्य, कला संस्कृतीतही तळेगावचा लौकिक आहे, त्यामुळेच शहराला दिवसेंदिवस पसंती लाभते आहे.

प्रदूषणमुक्त, निरोगी हवामान, पवना- इंद्रायणीचा मुबलक पाणीपुरवठा आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता यामुळे तळेगावकरांनी शहरीकरणासह वनराई जपली आहे. संगीत, नाट्य, संस्कृती व कला क्षेत्रात शहर पुढारलेले आहे. 
- प्रा. दीपक बिचे, साहित्यिक

निसर्गाबरोबरच तळेगावचे कलाजीवन रसिक- कलाकार मंडळींना आकृष्ट करीत आहे. अनेक कलाकार मंडळी येथील गृहप्रकल्पांची ब्रॅंड ॲम्बेसीडर आहेत. येथील वातावरण सुसह्य रहिवासाची अनुभूती देत आहे. 
- डॉ. अनंत परांजपे, विश्‍वस्त, कलापिनी

Web Title: budget second home talegaon