आध्यात्मिक शिक्षणासाठी ज्ञानमंदिरे उभारणार - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

देहू - ""शालेय शिक्षणाबरोबर नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षण देणारी ज्ञानमंदिरे राज्यात बांधण्यात येतील'', असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी (ता. 3) येथे दिले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

देहू - ""शालेय शिक्षणाबरोबर नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षण देणारी ज्ञानमंदिरे राज्यात बांधण्यात येतील'', असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी (ता. 3) येथे दिले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

प्रा. रामकृष्ण मोरे सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटनप्रसंगी माजी आमदार विलास लांडे, अभिमन्यू काळोखे, माउली काळोखे, फांउडेशनचे अध्यक्ष रमेश काळोखे, दत्तात्रेय अत्रे, संदीप टिळेकर उपस्थित होते. 

सुभाष देशमुख म्हणाले, ""ज्ञानेश्‍वर, तुकाराम यांच्या विचाराची जोपासना होणे गरजेचे आहे. त्यामुळे अध्यात्मिक शिक्षण देणारी ज्ञानमंदिरांची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मेक इन इंडिया', मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस "मेक इन महाराष्ट्र', तर आपण "मेक इन जिल्हा', तालुका, गाव हा संकल्प सोडून वाटचाल करत आहोत. त्यात उपेक्षितांचे प्रश्न, अडचणी सोडविण्यात प्राधान्य देण्यात येईल.'' 

प्रा. गणेश शिंदे यांचा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित संगीतमय "मोगरा फुलला' हा कार्यक्रम आयोजित केला होता. गायिका स्नमिता धापटे, आशुतोष सुरुजुसे यांनी साथ दिली. प्रा. गणेश शिंदे म्हणाले, ""जीवन जगताना संतांच्या विचारांची समाजाला गरज आहे. माउलींचे जीवन हे साऱ्या विश्वाला बंधुत्वाचा संदेश देते.''

Web Title: Build spiritual education says Subhash Deshmukh in dehu