निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला 32 लाख रुपयांना फसविले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे - कात्रज परिसरामध्ये रो हाउस बांधून देण्याच्या बहाण्याने एका निवृत्त सहायक पोलिस आयुक्ताची एका बांधकाम व्यावसायिकाने 32 लाख रुपयांची फसवणूक केली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

प्रकाश मॅमन जॉर्ज (वय 63, रा. घाटकोपर) यांनी फिर्याद दिली. त्यावरून बाबाजी बाबूराव जाधव (रा. सद्‌गुरू बंगला, धनकवडी) याच्याविरुध्द महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ऍक्‍ट आणि रेरा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉर्ज हे मुंबई पोलिस दलातून निवृत्त झाले आहेत. जाधव हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याने फिर्यादी यांना कात्रजमधील गायत्री बिल्डिंग येथे रो हाउस बांधून देतो, असे सांगितले. त्यानुसार 2011 पासून वेळोवेळी 32 लाख रुपयांची रक्कम घेतली. अद्याप इमारतीचे काम पूर्ण झाले नाही. जाधव याने फसवणूक करून पैशांचा अपहार केल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलिसांकडे केली होती. तपासानंतर गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

Web Title: The builder deceived the retired police officer

टॅग्स