पिंपरी: रहाटणीत व्यावसायिकाचा गोळ्या घालून खून 

संदीप घिसे 
मंगळवार, 24 जुलै 2018

अनिल रघुनाथ धोत्रे (वय ४४, रा. प्ररभात कॉलनी रहाटणी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धोत्रे यांचा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय आहे. दररोजचे काम उरकून ते रात्री घरी निघाले असता प्रभात कॉलनी, रहाटणी येथे त्यांना चोरट्याने अडवले.

पिंपरी (पुणे) : लुटमारीच्या उद्देशाने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका व्यावसायिकाला गोळ्या घालून त्याचा खून केला. ही घटना राहटणी येथे सोमवारी रात्री घडली.

अनिल रघुनाथ धोत्रे (वय ४४, रा. प्ररभात कॉलनी रहाटणी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धोत्रे यांचा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय आहे. दररोजचे काम उरकून ते रात्री घरी निघाले असता प्रभात कॉलनी, रहाटणी येथे त्यांना चोरट्याने अडवले. त्यांच्याकडील एक लाख ८६ हजारांची रोकड हिसकावली. त्यावेळी चोरटे आणि धोत्रे यांच्यात झटापट झाली. चोरटय़ांनी केलेल्या गोळीबारात धोत्रे यांचा मृत्यू झाला. याबाबत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

ज्या ठिकाणी लुटारुंनी गोळीबार केला त्या ठिकाणापासून अवघ्या दोनशे फूट अंतरावर गेल्या आठवड्यात एका बस चालकाचा खून झाला आहे. या घटनेतील आरोपींना शोधण्यात वाकड पोलिसांना अपयश आले आहे. लागोपाठ दोन खुनाच्या घटना घडल्याने राहटणी परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Web Title: builder shot dead in Rahatani

टॅग्स