तुऱ्या बैलाचा पाय मोडला; मालकिणीने हंबरडा फोडला!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

बारामती - प्राण्यांवर अमाप प्रेम करणारे असंख्य आहेत, याचा प्रत्यय गुरुवारी काटेवाडी चौकात आला. डांबरी रस्ता चढताना पाय घसरून आपला लाडका तुऱ्या बैल लंगडा झाल्याने मालकिणीने हंबरडा फोडला अन्‌ अनेकांच्या काळजाचा ठाव चुकला.  

बीड जिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी आलेल्या मुकादम नानासाहेब गरबडे यांची स्वतःचीच बैलगाडी काटेवाडीतून ऊस तोडून भवानीनगर कारखान्याकडे निघाली होती. काटेवाडीत चौकात जाताना छोटी चढण आहे, ही चढण चढली की इंदापूर-बारामती रस्ता सुरू होतो. बैलगाडीने ही चढण चढताना एका बैलाचा पाय डांबरी रस्त्यावरून निसटल्याने खुब्यात मोडला. 

पाय मोडल्याने बैल खालीच बसला. गाडी रुतल्याचे पाहून नानासाहेब गरबडे, त्यांची पत्नी, मुलगा सारेच गाडीपुढे धावत आले, पाहतो तर बैलाच्या पायातून रक्त येत होते. बैलाचा पाय मोडल्याचे पाहताच गरबडे कुटुंब हवालदिल झाले. गरबडे यांच्या पत्नीने तर तिथेच हंबरडा फोडला. त्यांचा मोठा आवाज ऐकून काटेवाडीतील चौकातील दुकानदार, ग्राहक धावत तिथे आले.

पत्नीबरोबर गरबडे यांचा मुलगाही धाय मोकलून रडू लागला. नानासाहेब गरबडे हेही खाली बसले. तो बैलही निपचित बसून मालकाने घेतलेल्या कुशीत तसाच पडून राहिला होता, हे चित्र मात्र पाहणाऱ्या साऱ्यांनाच अस्वस्थ करून गेले.

कुटुंबाचा मायबाप
तुऱ्या हा त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य तर होताच, पण या दुष्काळाच्या काळात तोच जणू कुटुंबाचा मायबाप ठरला होता. लाखमोलाचा बैल अधू झाल्याने आता पुढे काय करायचे हा प्रश्न जसा समोर होता, त्याचप्रमाणे यंदाचा दुष्काळ कसाबसा हातावरच्या पोटाने तरून नेण्याचे गरबडे कुटुंबाचे स्वप्न एका क्षणात धुळीला मिळाले होते.

आता आभाळाएवढा प्रश्‍न
आता नव्या बैलासाठी किंमत मोजायची यापेक्षाही आता या अधू बैलाचे काय करायचे हा आभाळाएवढा प्रश्‍न गरबडे कुंटुबाच्या पुढे उभा ठाकला आहे. बैलासाठी रडणारे हे कुटुंब पाहून काटेवाडीकरांसह रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना मात्र माणुसकीच्या संवेदना मुक्‍या जनावरांप्रती अजूनही किती टोकदार आहेत, याचा प्रत्यय देऊन गेले.

Web Title: Bull Injured