बंड धरणाचे दरवाजे तीन वर्षांपासून उघडेच ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

येरवडा - पुणे महानगरपालिकेने जलसंपदाच्या यांत्रिक विभागाच्या वतीने ऐतिहासिक बंड धरणाला पाच दरवाजे बसविले आहेत. मात्र बंड धरणाचे स्वयंचलित दरवाजे गेल्या तीन वर्षांत कधीच बंद झाले नाहीत, त्यामुळे तब्बल पंधरा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या बंधाऱ्याचा उपयोग काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. 

येरवडा - पुणे महानगरपालिकेने जलसंपदाच्या यांत्रिक विभागाच्या वतीने ऐतिहासिक बंड धरणाला पाच दरवाजे बसविले आहेत. मात्र बंड धरणाचे स्वयंचलित दरवाजे गेल्या तीन वर्षांत कधीच बंद झाले नाहीत, त्यामुळे तब्बल पंधरा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या बंधाऱ्याचा उपयोग काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

महापालिकेने काही वर्षांपूर्वी बंड धरणातील गाळ वाहून जाण्यासाठी धरणाला पाच ठिकाणी छेद दिले होते, त्यामुळे गेल्या काही पावसाळ्यांत धरणातील गाळ वाहून जाण्यास मदत झाली होती. मात्र धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शेजारी बोट क्‍लबच्या नौका विहाराला मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे बोट क्‍लबने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने धरणातील पाण्याची पातळी पूर्ववत करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. 

त्याप्रमाणे महापालिकेने जलसंपदाच्या यांत्रिक विभागाच्या वतीने साडेदहा कोटी रूपये खर्च करून बंड धरणाला बंधारा बांधला. त्यामुळे पावसाळ्यात नदीकाठावर असणाऱ्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरण्याचे बंद झाले. या बंधाऱ्यावर थोपद्वार बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. बंधाऱ्यावरील दरवाजे उघडण्याचे किंवा बंद करण्याचे नियंत्रण जलसंपदाच्या यांत्रिक विभागाकडे असले तरी महापालिकेच्या मागणीप्रमाणे हे दरवाजे उघडले किंवा बंद केले जाऊ शकतात. महापालिकेने हे दरवाजे अद्याप बंद केलेच नाहीत. 

"बंड धरणातील गाळ जाण्यासाठी, मुळा-मुठा नदीपात्रालगत असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये पुराचे पाणी जाऊ नये म्हणून आणि बोट क्‍लबला नौका विहारासाठी किमान पाण्याची पातळी ठेवण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांत दोन ते तीन वेळा धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. 
- श्रीनिवास बोनाला, कार्यकारी अभियंता, प्रकल्प 

नौका स्पर्धांसाठी उत्कृष्ट ठिकाण 
मुळा-मुठा नदीमधील गाळ काढल्याने मोठ्या प्रमाणात पाण्यातील जैवविविधता निर्माण होऊ शकते. बंड बंधाऱ्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढून नौका विहाराला चालना मिळू शकते. त्यामुळे महापालिका एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करून शकते. बंड धरणाचे पाच किलोमीटर अंतराचे विस्तीर्ण पात्र असल्यामुळे नौका स्पर्धांसाठी उत्कृष्ट ठिकाण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

Web Title: Bund dam door has been open for three years