शालेय परीक्षेचे ओझे कमी होणार - जावडेकर

शालेय परीक्षेचे ओझे कमी होणार - जावडेकर

पुणे - विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे ओझे कमी करण्यासाठी शालेय अभ्यासक्रम निम्म्याने कमी करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. अभ्यासक्रम 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्यासंदर्भात सुमारे 27 हजार जणांनी एक लाख सूचना पाठविल्या असून, सूचनांच्या परीक्षणाचे काम सुरू आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे सांगितले. 

ज्ञान प्रबोधिनी शाळेला जावडेकर यांनी शुक्रवारी (ता. 14) भेट दिली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेतील शैक्षणिक प्रयोगशाळेचीही पाहणी केली. ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, कार्यवाह सुभाष देशपांडे या वेळी उपस्थित होते. 

जावडेकर म्हणाले, ""शिक्षणाच्याच माध्यमातून देशाचा विकास शक्‍य आहे. येत्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचे ओझे कमी करून जीवन शिक्षणावर अधिक भर दिला जाणार आहे. चांगले शिक्षक घडविण्यासाठी इंटीग्रेटेड बी. ए. अभ्यासक्रम लवकरच सुरू केला जाईल. पाठांतर, घोकंपट्टी करून परीक्षेला बसविणे म्हणजे शिक्षण नाही, तर विषय, धडा समजून घेणे म्हणजे शिक्षण आहे. खेळ, मूल्य शिक्षण, कौशल्य, अनुभवावर आधारित शिक्षण आवश्‍यक आहे.'' 

काही शाळा सरकारकडे मदत मागण्यासाठी कटोरा घेऊन येतात; परंतु सामाजिक जाणिवेतून माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी काही काम करणे आवश्‍यक आहे. समाजाचा सहभाग असल्याशिवाय शिक्षणात सुधारणा होणार नाही. 
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com