Burglar arrested in Pune with Gold jewellery worth Rs 7 lakh 20 thousand seized
Burglar arrested in Pune with Gold jewellery worth Rs 7 lakh 20 thousand seized

पुण्यात घरफोड्या करणाऱ्यास अटक; ७ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त

औंध(पुणे) : चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी घरफोड्या करणऱ्यास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सात लाख वीस हजार रुपये किमतीचे १५३ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३२ वर्षे) रा.डॉ.आंबेडकर वसाहत, डीपी रस्ता औंध असे पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या घरफोड्या करणाराचे नाव असून त्याच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे यांना घरफोडी गुन्ह्याबाबत माहिती काढत असताना फेब्रुवारी २०२० मध्ये शासकीय तंत्रनिकेतन कर्मचारी वसाहत गणेशखिंड रस्ता येथील घरफोडी प्रकरणात त्याचा सहभाग असल्याची माहिती त्यांच्या खात्रीशीर खबऱ्याकडून मिळाली. यासंदर्भात वरिष्ठांना कळवून सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गलांडे यांच्या सुचनेनुसार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल 

उपनिरिक्षक वाघमोरे यांच्या नेतृत्वाखालील अंमलदार सारस साळवी, ज्ञानेश्वर मुळे, संतोष जाधव, तेजस चोपडे या पथकाने संबंधितास न्यायालयाच्या परवानगीने येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन चतु:शृंगी पोलीस ठाण्यांतर्गत हद्दीतील  तीन गुन्हे उघडकीस आणले असून सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे हे करत आहेत.

PM Vaccine Centres Visit Live : पंतप्रधान मोदी सिरम इन्स्टिट्युटमध्ये दाखल; कोरोना लशीचा घेणार आढावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com