पुण्यात घरफोडी करणारे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

pune-theft.jpg
pune-theft.jpg

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड़ शहरामध्ये घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरीसह विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळीस वानवडी पोलिसांनी बेडया ठोकल्या. एक किलो सोने, 10 किलो चांदी, तीन लाखांची रोकड, चार वाहने असा तब्बल 81 लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

गोरखसिंग गागासिंग टाक (वय 30), उजाला प्रभुसिंग टाक (वय 27), बल्लुसिंग प्रभुसिंग टाक (वय 30), जलसिंग रजपूत दुधानी (वय 26, सर्व रा.हड़पसर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिस ठण्यासह पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरी यांसारखे गुन्हे घडत होते. या पार्श्वभूमीवर वानवडी पोलीसांकडून या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. दोन्ही तपास पथके रामटेकडी येथील व शहरामध्ये झालेल्या घरफोडी ठिकाणी भेट देऊन 41 ठिकानचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यामध्ये प्रत्येक आरोपीच्या हालचालीचे निरीक्षण नोंदविण्यात आले. त्यामध्ये संबंधित आरोपी हे रामटेकडी येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गोरखसिंग व उजाला हे दोघेजन रामटेकडी येथील अंधशाळेच्या पाठीमागे असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये बल्लुसिंग व जलसिंग हे दोघे धुळे येथे गेले होते. पोलिसांनी धुळे येथील डण्डेलबाबा वस्ती रेल्वे मार्गालगत सलग तीन दिवस सापला रचुन त्यांना अटक केली.

आरोपींनी शहरात 50 घरफोड़या केल्या आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडुन एक किलो सोने, 10 किलो चांदी, 3 लाख रोकड, चारचाकी वाहने 6 वाहने, एक दुचाकी, एक विदेशी बनावटीके पिस्टल, 6 जीवंत काडतुसे, घरफोडीचे साहित्य असा 81 लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com