ते रात्री आले, त्यांनी सर्वांना कोंडले आणि हाय-नाय ते घेऊन गेले...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 December 2019

कडूस-आगरमाथा (ता. खेड) येथील माळीवस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री घरफोडी झाली. या घरफोडीत समीर मोहन नाईक व कुटुंबाला दोन चोरट्यांनी चाकू व लाकडी दांडक्‍याचा धाक दाखवून सुमारे पाच तोळे सोने-चांदी व पाच हजारांची रोकड लांबविली.

कडूस : कडूस-आगरमाथा (ता. खेड) येथील माळीवस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री घरफोडी झाली. या घरफोडीत समीर मोहन नाईक व कुटुंबाला दोन चोरट्यांनी चाकू व लाकडी दांडक्‍याचा धाक दाखवून सुमारे पाच तोळे सोने-चांदी व पाच हजारांची रोकड लांबविली.

 समीर, पत्नी अनुराधा व मुलगा यज्ञेश बंगल्याच्या बाहेरच्या खोलीत; तर आई नयनाबाई आतल्या खोलीत झोपल्या होत्या. रात्री एकच्या सुमारास दोन चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. जागे झालेल्या घरातील चारही सदस्यांना चोरट्यांनी चाकू व लाकडी दांडक्‍याचा धाक दाखवून खोलीतील कोपऱ्यात बसविले. एक जण हातात चाकू व लाकडी दांडके मुलाच्या डोक्‍यावर धरून दमबाजी करीत उभा होता, तर दुसरा चोर आतल्या खोलीत जाऊन कपाट, सुटकेस फोडून ऐवज लुटत होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चोरट्यांनी अंगावरील दागिनेसुद्धा काढून घेतले. घरफोडीत चोरट्यांनी पाच तोळे सोने व सुमारे पाच हजारांची रोकड लांबविली. यात गळ्यातील सोन्याची चैन, अंगठी, मंगळसूत्र, कानातील बाळी, आई नयनाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातील कुड्यांसह घरातील रोख रकमेचा समावेश आहे.

- 'गांधीगिरी' संदर्भात अमेरिकेच्या संसदेत मोठा निर्णय!

चोरट्यांनी जाताना नाईक कुटुंबाला आतल्या खोलीत कोंडले व त्या खोलीला तसेच मुख्य दरवाजाला बाहेरच्या बाजूने कडी लावून दोन्ही चोरटे दोन दुचाकीवरून पसार झाले. चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कडी लावून घेतली होती. समीरचा मोबाईल फोन व गाडीची चावी घराच्या बाहेर फेकून दिली होती. चोरट्यांचा हा थरार वीस मिनिटे सुरू होता. तोपर्यंत नाईक कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत कोपऱ्यात जीव मुठीत धरून बसून राहिले. आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. पण, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. 

CAA : दिल्ली हिंसाचारप्रकरणी 'भीम आर्मी' प्रमुख अटकेत!

100 नंबरची पोलखोल 
योगेश घोडेकर यांनी पोलिस मदतीसाठी रात्री एक वाजता 100 क्रमांक डायल केला. पण, यावर "पिंपरी-चिंचवड पोलिसांना फोन लागलाय. ग्रामीण पोलिसांना फोन करा,' असा सल्ला देण्यात आला. संकटात सापडलेल्या महिलेला अथवा नागरिकाला ऐनवेळी असा सल्ला मिळाला, तर त्याने करायचे काय, असा प्रश्न उपस्थितांनी व्यक्त केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burglary at kadus village